Home नाशिक देवळा मर्चंट को.आँपरेटिव्ह बँकेची सर्वसाधरण सभा संपन्न

देवळा मर्चंट को.आँपरेटिव्ह बँकेची सर्वसाधरण सभा संपन्न

54
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230924-200422_Gallery.jpg

देवळा,(भिला आहेर तालुका प्रतिनिधी) : –देमको बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटपास सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली असून इमारत नूतनीकरणासही सभासदांनी मान्यता दिली. बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार (ता.२३) रोजी चेअरमन कोमल कोठावदे यांच्या अध्यक्षतेखाली वत्सला लॉन्समध्ये झाली.
यावेळी बँकेच्या वाटचालीबाबत सांगताना व्हा.चेअरमन डॉ.प्रशांत निकम यांनी सांगितले की, नवनवीन आर्थिक योजना व थकबाकी वसुलीमुळे बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. देमकोची भांडवल पर्याप्तता ( CRAR) ४५ टक्के असून जिल्ह्यातील ४३ नागरी बँकांमध्ये तो सर्वाधिक आहे. सुरक्षित बँक म्हणून तिचा लौकिक कायम ठेवणे आणि कामकाजाचा आर्थिक व गुणात्मक दर्जा वाढवणे यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे
२०२२-२३ चे लेखापरीक्षण झाले असून या आर्थिक वर्षात बँकेला ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाल्याबद्दल व थकबाकी कमी केल्याबद्दल संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत संमत करण्यात आला. जुन्या थकबाकीची वसुली होण्याच्या दृष्टीने नवीन एकरकमी कर्ज परतफेड योजनेस सभासदांनी मंजुरी दिली.
देमकोचे माजी चेअरमन डॉ.व्ही.एम.निकम यांनी सभेच्या इतिवृत्ताची प्रत, ऑडिट रिपोर्ट मिळत नाही तरी मागणीनुसार माहिती मिळावी अशी मागणी केली. तसेच इतर बँकांचे थकबाकीदार असलेल्या संचालकांचे काय? त्यांना संचालक पदावर कायम ठेवता येते का या मुद्द्यावर सभासदांनी अशा संचालकांचे राजीनामे घ्या असा सूर व्यक्त केला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनीही ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित रहाव्यात यासाठी बँकेच्या थकबाकीची वसुली करताना कडक अंमलबजावणी करावी असे आवाहन केले. बँक इमारत नुतनीकरण व बँकेच्या स्वमालकीच्या जागेस कुंपण करण्याबाबत तसेच लोहोणेर व उमराणे येथे बँकेच्या शाखा सुरू करणेबाबत संमती दर्शवली. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भालेराव व व्हा.चेअरमन डॉ.प्रशांत निकम यांनी उत्तरे देत शंकासमाधान केले. शांताराम निकम, नितीन शेवाळकर, मुन्ना अहिरराव, पवन अहिरराव, संभाजी आहेर, प्रमोद पाटील, प्रवीण अलई, पुंडलिक आहेर, प्रदीप आहेर आदी सभासदांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून चर्चेत भाग घेतला. सभेस बँकेचे जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे, संचालक राजेंद्र सूर्यवंशी, अनिल धामणे, केदारनाथ मेतकर, राजेश मेतकर, भगवान बागड, प्रमोद शेवाळकर, योगेश राणे, हेमंत अहिरराव, मयूर मेतकर, अमोल सोनवणे, सुभाष चंदन, मनीषा शिनकर, नलिनी मेतकर, भारत कोठावदे तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवस्थापक नितीन बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.

Previous articleटोळीने गुन्हे करणारे चाळीसगावचे चौघे जिल्ह्यातून हद्दपार
Next articleदेगलूर महाविद्यालयाची खेळाडू ऋतुजा ला विद्यापीठीय टेबल टेनिस स्पर्धेत द्वितीय पारितोषिक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here