Home Breaking News *कोकणातील गणेश भक्तांची परतीच्या प्रवासाला एस.टी.ची निवड*

*कोकणातील गणेश भक्तांची परतीच्या प्रवासाला एस.टी.ची निवड*

62
0

*कोकणातील गणेश भक्तांची परतीच्या प्रवासाला एस.टी.ची निवड*

*कोल्हापूर (मोहन शिंदे युवा मराठा न्युज )*

कोकणातून गणपतीचा सणानंतर मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीने सोडलेल्या जादा फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 855 गाडय़ांचे नियोजन झाले असून वैयक्तिक आरक्षणाद्वारे 175 तर ग्रुप बुकींगच्या 182 अशा एकूण 357 गाडय़ा फुल झाल्या आहेत. रत्नागिरीतून ग्रुप बुकींगच्या 113 तर वैयक्तिक 148 अशा एकूण 261 गाडय़ांचे आरक्षण फुल झाले आहे, तर 294 गाडय़ांचे आरक्षण अंशतः फुल झाले आहे.
एसटीने यंदा 5 ऑगस्टपासून कोकणात गणपतीसाठी जादा गाडय़ा सोडल्या होत्या. या गाडय़ांना 12 ऑगस्टपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 13 ऑगस्टपासून कोरोना चाचणीचा नियम टाकल्याने एसटीच्या गाडय़ांना प्रतिसाद कमी झाला. आता परतीच्या प्रवासासाठी 23 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मुंबईकर चाकरमान्यांनी पुन्हा आपल्या एसटीला प्रतिसाद दिला आहे. 28, 29 व 30 ऑगस्ट शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा विकेण्डला परतीच्या प्रवासासाठी सर्वाधिक एसटी बसेसचे आरक्षण झाले आहे.
28 ऑगस्टला 15 ग्रुप आरक्षण तर 27 वैयक्तिक आरक्षणाच्या अशा 42 बस फुल्ल तर 150 बसेसचे अंशतः आरक्षण अशा 192 तर शनिवारी 29 ऑगस्ट रोजी 68 ग्रुप बुकींग तर 68 वैयक्तिक आरक्षण अशा 136 बसेस फुल्ल तर 140 बसेस अंशतः फुल्ल अशा 276 बसेस सुटणार आहेत. तर रविवार 30 ऑगस्ट रोजी 77 ग्रुप तर 77 वैयक्तिक आरक्षण अशा 154 बसेस फुल्ल झाल्या असून 131 अंशतः भरलेल्या अशा 285 बसेस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून सुटणार आहेत.

Previous article*गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर ओसरला*
Next article🔴 *कोरोना ब्रेकिंग* 🔴 *पेठ वडगांव मधे कोरोनाचा चौथा बळी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here