Home नाशिक प्रहार पक्ष युवा आघाडी ने केला मुलीचा आगळावेगळा वाढदिवस साजरा

प्रहार पक्ष युवा आघाडी ने केला मुलीचा आगळावेगळा वाढदिवस साजरा

97
0

आशाताई बच्छाव

IMG-20230924-WA0039.jpg

प्रहार पक्ष युवा आघाडी ने केला मुलीचा आगळावेगळा वाढदिवस साजरा

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

मुलगी शिकली प्रगती झाली याप्रमाणे व प्रहार पक्षप्रमुख बच्चू कडू यांच्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे उपजिल्हा प्रमुख जयेश जगताप यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे .आज जन्मदिवस म्हटल की भरमसाठ खर्च केला जातो विविध प्रकारच्या पार्ट्या केक,नवीन कपड़े,नातेवाईक/मित्रपरिवार यांना बोलावून भोजन अश्या आदी गोष्टीवर खर्च केला जातो,त्यात लहान मूलांचा असला की मग अजुनच जास्त खर्च होतो.परंतु प्रहार युवा आघाडी चे उपजिल्हाप्रमुख जयेश जगताप यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही,पेन पेन्सिल ,दप्तर आदी वस्तू वाटप करून मुलीचा दहावा वाढदिवस साजरा केला व जिल्हा परिषद शाळेतील दोन गरीब विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा वार्षिक खर्च उलचलेला आहे त्यामुळे शालेय समितीने व मुख्याध्यापिका महाजन मैडम,दिघे सर क्षीरसागर सर,सुपर मैडम,घोलप दराडे व सर्व शिक्षकवर्ग यांनी आभार मानले आणि सर्व स्तरावर कौतुकही होत आहे यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे धारराव सर यांनी आपले आभार व्यक्त करतांना म्हटले.त्यावेळी सोमनाथ धुमाळ,दत्ता आरोटे,दीपक मोरे,विकास पांगारकर,साहिल शेख,भरत सेन्द्रे,मगन मेघवाल आदि उपस्थित होते.

Previous articleविठ्ठल रखुमाई ग्रुप च्या सौ शारदा ताई गवळीं ची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला सरचिटणीसपदी नियुक्ती
Next articleटोळीने गुन्हे करणारे चाळीसगावचे चौघे जिल्ह्यातून हद्दपार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here