• Home
  • 🛑 महाविकास आघाडी पालिका निवडणुका एकत्र लढवणार….! अजित पवार 🛑

🛑 महाविकास आघाडी पालिका निवडणुका एकत्र लढवणार….! अजित पवार 🛑

🛑 महाविकास आघाडी पालिका निवडणुका एकत्र लढवणार….! अजित पवार 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे -⭕’आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत एकत्र लढायच्या आहेत. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा,’ असे सूचना वजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.

शहरातील करोना स्थितीबाबत पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी करोना स्थितीबाबत भाजप राजकारण करत असल्याचे सांगत काही अधिकाऱ्यांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.

बैठकीला खासदार ऍड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष व आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, वैशाली बनकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी पालिका निवडणुकीबाबतही पदाधिकाऱ्यांनी मुद्दे उपस्थित केले.

त्यावेळी चारऐवजी 2 प्रभागांत निवडणुका होण्यावर चर्चा झाली.

तर, ‘महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून, मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. त्यामुळे सरकार पडेल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्याकडे लक्ष न देता आपल्याला आगामी महापालिका निवडणुका आपल्याला कॉंग्रेस आणि शिवसेनेला बरोबर घेऊन एकत्र लढवायच्या आहेत. त्यामुळे दृष्टीने जागा वाटपाचा निर्णय होईल,’ असेही पवार यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले….⭕

anews Banner

Leave A Comment