• Home
  • 🛑 बाप्पाच्या आगमनासह….! मुंबईकरांसाठी खुशखबर – शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव तुडुंब भरले 🛑

🛑 बाप्पाच्या आगमनासह….! मुंबईकरांसाठी खुशखबर – शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव तुडुंब भरले 🛑

🛑 बाप्पाच्या आगमनासह….! मुंबईकरांसाठी खुशखबर – शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव तुडुंब भरले 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुंबईला पाणी पुरवठा करणारेे भातसा हा तलाव 93 टक्के भरला आहे तर मध्य वैतरणा 94 टक्के.तर सर्व तलावात मिळून 92 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला नियमीत 3900 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो.तर त्यातील 2 हजार दशलक्ष लिटर पेक्षा जास्त पुरवठा एकट्या भातसा तलावातून होतो.भातसा तलावाची क्षमता 7 लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटर असून आज सकाळ पर्यंत 6 लाख 69 हजार 847 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.मुंबईला वर्षभर 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते तर आज 13 लाथ 37 हजार 90 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.मध्य वैतरणा तलैवही 94.10 टक्के भरला असून 1 लाख 82 हजार 105 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. यापुर्वी तुळशी, विहार,तानसा,मोडकसागर हे तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर )

अप्पर वैतरणा – 175993

मोडकसागर – 128925

तानसा – 144475

मध्य वैतरणा – 182105

भातसा – 669847

विहार – 27698

तुळशी – 8046

⭕❗⭕❗⭕❗⭕❗

anews Banner

Leave A Comment