Home नांदेड देगलूर येथील सावित्रीबाई फुले शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

देगलूर येथील सावित्रीबाई फुले शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

155

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0015.jpg

देगलूर येथील सावित्रीबाई फुले शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर शहरातील सावित्रीबाई फुलबोल शाळेत मंगळवार ता. 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन साजरा करण्यात येतो. यावेळी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व उत्तेजक हालचाली आणि योगासने सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केली.विद्यालयांचे विनोद भुताळे तसेच देवानंद कंधारकर यांनी प्रत्यक्ष योगा करून दाखवले व मार्गदर्शन केले.
यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यशवंत गजभारे, प्रा. मुख्याध्यापक किशन पाटील,शिक्षक भुताळे,पाळेकर,सोमुरे, ,बोरगावकर, राजूरकर,ठाणेकर,कंधारकर,असप्तवार, सौ.उगीले,बिल्लाळीकर,सूर्यवंशी, चिद्रावार,कपाळे, पवार,मुजावर या सर्वांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेतला.

Previous articleशिवकल्याण संस्थेच्या वतीने चिमुकल्यांना दिले योगाचे धडे.
Next articleनांदगाव तालुक्यात वडाळी या गावी घरातल्या किचन मध्ये आढळलं कोब्रा             
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.