• Home
  • 🛑 *पुण्यात सुरु झाली ऑक्सफर्डच्या लशीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी* 🛑

🛑 *पुण्यात सुरु झाली ऑक्सफर्डच्या लशीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी* 🛑

🛑 *पुण्यात सुरु झाली ऑक्सफर्डच्या लशीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय तसेच कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या जगभरात मोठया प्रमाणावर लस संशोधन सुरु आहे.या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या आजारा संदर्भात माहिती देणारी संकेतस्थळ सुरु केली आहे.या वेबसाइटवर कोरोना विषाणूवर झालेल्या संशोधनाचा डाटा,भारतातील संभाव्या लशींच्या क्लिनिक चाचण्यांची माहिती उपलब्ध असेल,असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

भारतात कोरोनावरील २०२१च्या सुरुवातीला पहिली लस उपलब्ध होऊ शकते,असे डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. मागच्या २४ तासात ८२ हजार १७० कोरोना रुग्णांची नोंद झाली.आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार सोमवारी भारतात कोरोना रुग्णांचा आकडा ६० लाखाच्या पुढे गेला.भारतात सध्याच्या घडीला तीन लशी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.

ऑक्सफर्डने विकसित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे.पुण्यातल्या ससून रुग्णालयात तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली.सिरम इन्स्टि्टयूट या लशीची निर्मिती करणार आहे.स्वदेशी लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेककडून दुसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे.

झायडस कॅडिला तिसऱ्या फेजच्या चाचणीची परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे.ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचणीसाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ४३ स्वयंसेवकांची निवड केली आहे. त्यातील १२ जणांना लशीचा पहिला डोस द्यायला आहे…⭕

anews Banner

Leave A Comment