Home विदर्भ वानखेड मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत...

वानखेड मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून निषेध…

319
0

राजेंद्र पाटील राऊत

वानखेड मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून निषेध…

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख
कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड गाव मध्ये कर्नाटकातील त्या घटनेचा निषेध करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमा जाळल्या…तीन दिवसापूर्वी बेळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या घटनेचे बेळगाव सह महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त केला.याप्रसंगी वानखेडच्या सरपंचा श्रीमती मंगलाताई रंगभाल,उपसरपंच राजू भाऊ पाखरे, मनोज पालीवाल,नरेंद्र देशमुख, अमित रंगभाल, निलेश आंबुसकर,अनिल इंगळे,शिवाजी आमझरे,सुनील लोणे,बाळू सांगळे, लखन दबडकार, ज्ञानेश्वर घूले, सचिन मेंहेगे ,शाम पालिवाल, देविदास वरपे, शिवा हागे, जय मंगल पाखरे, विलास पारिसे, मारोति पाखरे, अक्षय बंड, गोपाल बदरखे,आशिष बंड यासह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.

Previous articleदुर्गादैत्य गावातील इलेक्ट्रिक पोल दुरुस्तीची लेखी तक्रार
Next articleउमरदरीवाडी येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहन व सप्ताहाताची सांगता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here