Home Breaking News पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

99
0

🛑 पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

लोणावळा :⭕ – पावसाळ्यात पर्यटन करणाऱ्या पर्यटकांसाठी लोणावळ्यातील आवडते ठिकाण असलेले भूशी धरण यंदाच्या मोसमात पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार नाही. पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुशी धरण पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे.

लोणावळ्यातील भुशी धरण व लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाटाचा परिसर, हवेली तालुक्यातील खडवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, वेल्हा तालुक्यातील पानशेत व परिसर यंदाच्या वर्षी बंद ठेवण्यात येणार आहेत.
भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात आणि गडकिल्ल्यांच्या परिसरात पावसाळी पर्य़टनासाठी शनिवार आणि रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. धरण परिसरात अनेक पर्य़टकांचे बुडून मृत्यू होतात. कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. धरण क्षेत्रात पाऊस जास्त पडत असल्याने धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतो. त्यामुळे पर्यटक वाहून जाण्याच्या घटना घडतात.

यंदाच्या वर्षी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी भुशी धरण व लोणावळा परिसर तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व धऱण क्षेत्रांमध्ये पर्यटनास बंदी करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये कारवाई केली जाणार आहे.⭕

Previous articleअजितदादांचे पहाटे साडेपाचला काम सुरू होते तेव्हा!
Next articleधक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here