Home Breaking News खासदारांचा रिपोर्ट कार्ड ! देशातील टाँप ५ मधे महाराष्ट्रातील ३ खासदार ...

खासदारांचा रिपोर्ट कार्ड ! देशातील टाँप ५ मधे महाराष्ट्रातील ३ खासदार ✍️ ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

115
0

🛑 खासदारांचा रिपोर्ट कार्ड !
देशातील टाँप ५ मधे महाराष्ट्रातील ३ खासदार 🛑
✍️ ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे देशातील टॉप फाईव्ह खासदारांमध्ये पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत तर, त्यांच्या पाठोपाठ धुळ्याचे भाजप खासदार सुभाष भामरे, शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, मध्य प्रदेशचे सुधीर गुप्ता आणि जमशेदपूरचे बिद्युत महतो यांचा समावेश आहे. पुण्यातील परिवर्तन या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे

महाराष्ट्रातील पाच खासदार

लोकसभेच्या कामकाजात उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि सादर केलेली विधेयकं खासदारांच्या कामगिरीसाठी महत्वाची समजली जातात
याच निकषावर महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, सुभाष भामरे, डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे.

गोपाळ शेट्टी अव्वल

सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशातील पहिल्या पाच खासदारांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तर भाजपचे तीन खासदार आहेत. महाराष्ट्रातील टॉप फाईव्हमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, भाजपचा एक आणि शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश आहे. विधेयकांच्याबाबतीत भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

लोकसभेच्या संसदीय कामकाजात महाराष्ट्र अव्वल आहे. तर अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे हे तसे नवे खासदार असूनही त्यांची कामगिरी चमकदार आहे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here