Home मुंबई एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, बेदमुदत मागे..! युवा मराठा वेब न्युज चॅनेल च्या...

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, बेदमुदत मागे..! युवा मराठा वेब न्युज चॅनेल च्या पाठपुराव्याला मोठे यश…एस टी कामगारांची दिवाळी गोड होणार

182
0

राजेंद्र पाटील राऊत

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, बेदमुदत मागे..! युवा मराठा वेब न्युज चॅनेल च्या पाठपुराव्याला मोठे यश…एस टी कामगारांची दिवाळी गोड होणार

ठाणे (अंकुश पवार/सहसंपादक,ठाणे/युवा मराठा वेब न्युज चॅनेल/साप्ताहिक)
अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे.
आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून उपोषणास बसले आहेत मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावर एसटी कर्मचारी ठाम होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या राज्य शासनाने केल्या मान्य, आंदोलन घेतलं मागेविविध मागण्यांसाठी गेले काही तास एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरु होते, आंदोलनाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला होता

गेले काही तास राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. हे आंदोलन करत एसटी वाहतूक सेवाही बंद ठेवण्याचा पवित्रा कर्माचाऱ्यांनी घेतला होता. यामुळे राज्यातील १५० पेक्षा जास्त एसटी महामंडळाच्या आगारातून एकही एसटी बाहेर पडली नव्हती. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या अशा आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल झाले होते.
अखेर मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटनेबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या एकुण तीन मागण्या होत्या. नव्या वेतन करारानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून द्यावा या दोन प्रमुख मागण्या होत्या. तर वेतन करारातील पगारवाढीचा मुद्दा आहे त्यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असंही आवाहन परब यांनी केलं.

तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांची शासन मान्यताप्राप्त प्रमुख संघटना महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी या निर्णयांवर समाधान व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं
काय आहेत एस टी कर्मचा-यांच्या मागण्या

महागाई भत्ता देण्यात यावा
वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी घरभाडे भत्ता 8, 16, 24 % प्रमाणे देण्यात यावे दिवाळीपूर्वी वेतन मिळावे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला होता. त्यामुळे ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे तर राज्यातील ग्रामीण भागात प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here