Home गडचिरोली स्वस्त धान्य दुकानमध्ये लवकरात लवकर गव्हाचा पुरवठा करावा – लिलाधर भरडकर

स्वस्त धान्य दुकानमध्ये लवकरात लवकर गव्हाचा पुरवठा करावा – लिलाधर भरडकर

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220831-WA0081.jpg

स्वस्त धान्य दुकानमध्ये लवकरात लवकर गव्हाचा पुरवठा करावा – लिलाधर भरडकर

गेल्या तीन महीन्यापासून दुकानात गहू आलेलाच नाही आठ दिवसात पुरवठा न केल्यास करणार आंदोलन       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये मागील तीन महीन्यापासून गव्हाचा पुरवठा होत नसल्याने शेतकरी राजाचा बैलपोळा सारख्या सणासुदीमध्ये गहू उपलब्ध न झाल्यामुळे गव्हाच्या पोळीवीना सण साजरा करण्याची वेळ ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नागरीकांवर आली आहे. गणेश उत्सोवासारखा सण सुरु असतांना गरजू लाभार्थ्यांना राशन दुकानातुन गहू मीळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. सर्व सामान्य नागरीकांना आताच्या वाढलेल्या जीएसटीमुळे गहू व अन्य धान्यावरील दरवाढ अवाक्याबाहेर झाल्याने सामान्य नागरीक गहू खरेदी करु शकत नाही. शासनाकडून गव्हाचा अनीयमीत पुरवठा होत असल्याने ही परीस्थीती उद्भवली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्याना स्वस्त दरातील गव्हांपासून वंचीत राहावे लागत आहे. जील्ह्यात प्रमाणापेक्षा अधीक पाऊस पडल्याने अतीवृष्टी सारखी परीस्थीती नीर्माण झाली आणि सामान्य कुटुंबातील साठवून ठेवलेला अन्नधान्य पाउसामुळे खराब झालेला आहे. तरी गडचिरोली सारख्या जील्ह्यात अधीकारी व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. तसेच माहे जुन महीन्याचे पैसे वाला कंट्रोल चे धान्य आणि फ्री धान्य वाटप करायचे आदेश जिल्हापुरवठा अधीकारी यांनी लवकरात लवकर द्यावे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व राशन दुकानाचे लाभार्थ्याना मोफत धान्यांचे कमीशन लवकर अदा करावे. तरी आठ दिवसाच्याआत राशन दुकानात स्वस्त दरातील गव्हाचे पुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा जिल्हा अन्न पुरवठा अधीकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्याता येईल. असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष् लिलाधर भरडकर, तसेच युवक विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, तालुका अध्यक्ष श्रीधर येरावार यांनी इशारा दिला आहे.

Previous articleएका ड्रायव्हरची कैफीयत!
Next articleजिंतूर तालुक्यातील पिकांनी टाकल्या माना, शेतकरी चिंताग्रस्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here