Home सामाजिक एका ड्रायव्हरची कैफीयत!

एका ड्रायव्हरची कैफीयत!

64
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220831-190015_Google.jpg

एका ड्रायव्हरची कैफीयत!
_____________________
राजेंद्र पाटील -राऊत
मुख्य संपादक युवा मराठा
_____________________
मालेगांव- आज सकाळी कामानिमित थोडे बाहेर गेलेलो होतो.आणि योगायोगाने माझा एक हितचिंतक ड्रायव्हर असलेला मित्र भेटला.गप्पाच्या ओघात तो माझ्याजवळ बरंच काही बोलून गेला.की,”ड्रायव्हरचे जगणे म्हणजे लाचारीचे जीणं” झालेले असल्याचे त्याने सांगितले.अक्षरशः रडकुंडीला येऊन तो आपली कैफीयत सांगत होता.ड्रायव्हरला पुरेसा कुणी पगार देत नाही.बदल्या मिळाल्या तर हातात चार पाचशे रुपये टिकवतात.त्यापेक्षा भयानक परिस्थिती महिन्याने काम करणाऱ्या ड्रायव्हरच्या हातात जेमतेम दहा अकरा हजार रुपये मिळतात.ड्रायव्हरला माणूस म्हणून बघण्याची नितांत गरज असल्याचे त्याने सांगितले.ड्रायव्हरचा फक्त कामापुरता वापर केला जातो,ड्रायव्हरकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सुध्दा फारसा चांगला नसतो.म्हणून ड्रायव्हरची जिंदगी ही बेक्कारच आहे असं म्हटलं तर अतिशयोक्तीचे काहीच ठरणार नाही.ड्रायव्हरांच्या अनेक संघटना तयार झाल्या,परंतु त्यामुळे ड्रायव्हरांच्या जीवनात फार मोठा काही फरक पडला नाही हे दुदैवच म्हणावे लागेल.एका बाजुला ड्रायव्हरला सारथी म्हणायचे अन दुसऱ्या बाजुला त्याच्या हाती मात्र मेहनत करुनही काहीच पडत नाही हीच मोठी शोकांतिका आहे.ड्रायव्हर म्हणजे कृष्णाचा अवतार हातात स्टेरींग पकडल्यावर सुदर्शन चक्राप्रमाणे प्रवाशांचे जीवन ड्रायव्हरच्या स्वाधीन असते.वेळ काळ रात्री दिवसा जीवाची पर्वा न करता ड्रायव्हर रस्त्यावर जीवन मरणाचे खेळ खेळत असतो.निदान ड्रायव्हरलासुध्दा माणूस म्हणून माणूसकी द्या..त्याच्या कामाचा योग्य मोबदला त्याला द्या..आणि ड्रायव्हर बांधवाना देखील सन्मानाची वागणूक द्या…शेवटी ते देखील एक माणूसच आहेत.याची जाण ठेऊन प्रत्येकाने आपली विचारसरणी बदलून ड्रायव्हर बांधवाप्रती आत्मियता दाखवावी एवढीच माफक अपेक्षा या निमिताने!

Previous articleगणरायांचे उत्साहात आगमन पुणे,मुंबई सह अवघा महाराष्ट्र भक्ती रसात चिंब!
Next articleस्वस्त धान्य दुकानमध्ये लवकरात लवकर गव्हाचा पुरवठा करावा – लिलाधर भरडकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here