Home महाराष्ट्र गणरायांचे उत्साहात आगमन पुणे,मुंबई सह अवघा महाराष्ट्र भक्ती रसात चिंब!

गणरायांचे उत्साहात आगमन पुणे,मुंबई सह अवघा महाराष्ट्र भक्ती रसात चिंब!

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220831-WA0051.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: पुणे,मुंबई सह अवघा महाराष्ट्र भक्ती रसात चिंब! संपूर्ण देशात त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीचे आगमन हे उत्साहात पार पडत आहे.१४ विद्या, आणि ६४ कलांच्या गणपतीचे उत्साहात आगमन झाले आहे. मुंबईमध्ये लालबागचा राजा चरणी भक्तीचा महासागर लोटला आहे. सुवर्ण गणेशाचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविक आतुर झाले आहेत .गणेश मंडळासह ,घरोघरी गणपतीचे दिमाखात प्रतिष्ठापना झालेली आहे. महाराष्ट्रात, त्याचबरोबर कोकणात सुद्धा गणेशोत्सव शिगेला गेला आहे. राजकारणी नेत्यांच्या घरी सुद्धा गणपती विराजमान झाले आहेत .त्याचबरोबर वडाळ्यात जीएसबी गणपती सुद्धा विराजमान झालेले आहेत .पुण्यातील मानाचे पाच गणपती ही विराजमान झालेले आहेत. त्यामध्ये कसबा, तांबडीताज,गुरुजी तालीम, तुळशीबाग, केतकी वाडा या पाचही गणपतीचे मोठ्या थाटामाटात विराजमान झालेले आहेत. त्या पाचही गणपतीच्या ढोलताशांच्या गजरात बापांचा आगमन मोठ्या जल्लोषात झालेला आहे. लाखो चाकरमानी गणपती च्या चरणी विनम्र झालेले दिसत आहेत. पुण्यातील दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना पण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यपालाकडून सुद्धा गणपतीची पूजा पार पडत आहे .एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात त्याचबरोबर देशांमध्ये गणपतीचा उत्साह खूप धुमधडाक्यात पाहायला मिळतोय. दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर हा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले दोन वर्षानंतर महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस आनंदात पार पडत आहेत हे पाहून आम्हाला आनंद वाटतोय. दिल्लीतील महाराष्ट्र सदना मध्ये सुद्धा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. दोन वर्षानंतर सर्व सण उत्साहात पार पडत आहेत ,हे सर्व सणांचा आनंद घरोघरी त्याचबरोबर संपूर्ण जनतेने घ्यावा असं आम्हास वाटते. एकंदरीत काय तर गणपती उत्सव यावर्षी धूम धडाका साजरा होणार हे नक्की.

Previous articleभोकरच्या गणेश मंदीरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
Next articleएका ड्रायव्हरची कैफीयत!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here