Home परभणी जिंतूर तालुक्यातील पिकांनी टाकल्या माना, शेतकरी चिंताग्रस्त

जिंतूर तालुक्यातील पिकांनी टाकल्या माना, शेतकरी चिंताग्रस्त

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220831-WA0082.jpg

जिंतूर तालुक्यातील पिकांनी टाकल्या माना, शेतकरी चिंताग्रस्त

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी) जिंतूर:-तालुक्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने खरिप हंगामातील कापुस, तुर, मुग व सोयाबीन हि पिके धोक्यात आली असल्याने पाऊस कधी पडतो यासाठी बळिराजाचे डोळे चिंताग्रस्त अवस्थेत अकाशाकडे लागले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी वरुणराजाने शेतकऱ्याच्या समस्येकडे चांगलीच डोळेझाक केल्याचे दिसुन येत आहे.
खरिप पेरणीपासून बळीराजाच्या नशीबी धकधक सुरु झाली मृगनक्षत्रात पेरणी केलेले सोयाबीन दुबार पेरणी करावी लागल्याने आर्थिक संकट ओढावले गेले. कर्जबाजारी अवस्थेत कसीबसी दुबार पेरणी केली परंतु त्यानंतरही पाहिजे तसा पाऊस पडला नाही..
रिमझिम अवस्थेतच खरिप पिकांनी जोम धरला. दमदार पावसाची अपेक्षा कायमच राहिली गेली परंतु सद्यस्थितीत हि पावसाची प्रतिक्षाच करावी लागत आहे खरिप हंगामातील कापुस पिके बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहेत तर सोयाबीन पिकाला शेंगा लागण्यास सुरुवात झाली. परंतु पावसाचा थांगपत्ताच लागत नसल्याने खरिप पिके धोक्यात आली असल्याने पाऊस कधी पडतो यासाठी बळिराजाचे डोळे अकाशाकडे लागले आहेत.

Previous articleस्वस्त धान्य दुकानमध्ये लवकरात लवकर गव्हाचा पुरवठा करावा – लिलाधर भरडकर
Next articleनांदेड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here