Home नांदेड अवैध मुरूम उत्खननावर जिल्हाधिकारी यांची कार्यवाही, तीन जेसीबी व एक हायवा जप्त.

अवैध मुरूम उत्खननावर जिल्हाधिकारी यांची कार्यवाही, तीन जेसीबी व एक हायवा जप्त.

139
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0009.jpg

अवैध मुरूम उत्खननावर जिल्हाधिकारी यांची कार्यवाही, तीन जेसीबी व एक हायवा जप्त.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नायगाव बाजार-नायगाव तालुक्यातील अवैध मुरुम उत्खननावर स्वतः जिल्हाधिकाऱ्यानी कार्यवाई करीत तीन जेसीबी व एक हायवा गाडी जप्त केली. कोलंबी जवळ गोधमगाव शिवारात २१ जुलै करण्यात आली. सदर वाहने कहाळा टोल नाक्यावर लावण्यात आले असून त्यांच्याकडून २४ लाख ५० हजार रुपयाची दंडाची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नायगवचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी दिली आहे.

नांदेड चे जिल्हाधिकारी विपीन इटनकर हे शासकीय कामासाठी मुखेड येथे गेले होते. परत येताना कोलंबी गोधमगाव शिवारात तीन जेसीबी आणि एक हायवा गाडी  उभी असलेली दिसली. ज्या ठिकाणी ही यंत्रणा उभी होती तेथून जवळ मुरुमाचे उत्खणन केल्याचे दिसून आले.

त्यामुळे हे तीन जेसीबी व हायवा गाडी जप्तीची कार्यवाही जिल्हाधिकारी इटनकर यांनी केली. असली तरी गोधमगाव ते नायगाव ज्या ठिकाणी मुरूम उतखनन गेल्या महिनाभरापासून चालू असताना नायगाव महसूल कोणतीच कार्यवाही न करता गप्प का होते यावर उलट सुलट चर्चा होत आहे. त्या ठिकाणी तहसीलदार नायगाव व उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी अभय दिल्यानेच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाधिकारी यांनी मुरूम पकडल्याने या मुरूमला परवानगी नसल्याचे उघडकीस आले आहे.जिल्हाधिकारी यांनी मांजरमचे तलाठी शहाणे यांना पंचनामा करावयास लावले. अवैध मुरुमाचे उत्खनन करण्याच्या उद्देशाने ही वाहने तेथे उभी केली असल्याचे पंचनाम्यात नोंद घेवून तसा अहवाल तहसीलदारांना सादर केला आहे. प्राप्त अहवालानुसार तहसीलदार गजानन शिंदे यांनी दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी बिलोली यांचेकडे प्रस्ताव पाठवला होता या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नायगाव तहसीलदार यांनी २४ लाख ५० हजार रु.चा दंड लावून संबधित जी जी कन्स्ट्रक्शन या गार्गी कंपनीला दंड लावला आहे.

Previous articleसोलापूर पोलीस दलाच्या वतीने मुख्यालयात बंजारा हस्तकलेच्या वस्तूचे प्रदर्शन
Next articleबाप(जागतिक पालक दिन)         
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here