नाशिकमध्ये स्क्रिंनिंग तपासणी कार्यक्रम संपन्न , नाशिक( विष्णू अहिरे,विभागीय संपादक नाशिक युवा मराठा न्यूज़ नेटवर्क) रविवार दि १६ ऑगस्ट रोजी पंचवटी प्रभाग 3 मध्ये सौ प्रियंका ताई धनंजय माने नगरसेविका प्रभाग 3 यांच्या वतीने मिशन झिरो नाशिक अंतर्गत स्क्रिनींग व कोरोनाची तपासणी त्यांचे सम्पर्क कार्यालयात करण्यात आली रासबिहारी मेरी लिंक रोड मानेनगर परीसरातील नागरिकांनी तपासणी करुन घेतली, गेल्या आठवड्या पासुन हा तपासणी कार्यक्रम प्रियंका ताई व त्यांचे पती धनंजय भाऊ माने राबवित आहेत, कोरोना संकटात आरोग्य सेवा चोख बजावणारे डॉक्टर नर्स, यांचा सत्कार प्रियंका ताई यानी केला कोरोना नी शिरकाव केलेपासुन लॉकडाउन काळात त्यानी सलग 3 महिने गोर गरीब जनतेला रोज अन्न पुरवले त्याच बरोबर कोरोना बाबत जागृती करुन लोकांना धीर देत आहेत, पोटा पाण्याचा प्रश्न सोडवून लोकांच्या आरोग्याची ही काळ जी घेणारे प्रियंका ताई व धनंजय माने हे प्रभाग 3 मध्ये देवदूत ठरले असे म्हणणे वावगे ठरणार नाही, जनतेचे प्रतिनिधित्व कसे असावे यासाठी ताई व पप्पू भाऊ यांचे काम उत्तम उदाहरण आहे