• Home
  • *युवा मराठा न्युज चा इफेक्ट* आरोग्य अधिकारी ठेंगोडयात दाखल सटाणा

*युवा मराठा न्युज चा इफेक्ट* आरोग्य अधिकारी ठेंगोडयात दाखल सटाणा

*युवा मराठा न्युज चा इफेक्ट*
आरोग्य अधिकारी ठेंगोडयात दाखल सटाणा, दि.१७(जयवंत धांडे तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
*ठेगोंडा येथील प्रगतीशील शेतकरी श्री तुळशीदास शंकरराव शिंदे यांनी सोशल मीडियावर कोरोना महामारी मुळे गावात ५ ते ६ लोकांचा म्रुत्यु झाल्यामुळे त्या संदर्भात डॉक्टर शासन शासकीय अधिकारी व राज्य कर्ते पुढारी यांचे दुर्लक्ष झाले या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडिया वाटसफ ग्रुपवर व्हायरल झाला त्याची दखल घेऊन युवा मराठा न्युज वर बातमी प्रसारित करण्यात आली होती त्याची दखल घेत तालुक्यातील शासकीय रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री हेमंत आहिरराव डॉक्टर श्री राहुल सोनवणे डॉ हिरे यांनी तातडीने गावातील परिस्थितीची चौकशी करून गावातील डॉक्टर साखरे डॉक्टर धोंडगे तसेच गावातील सुज्ञ नागरिक सिस्टर आशा वर्कर्स यांची ग्रामपंचायत कार्यालयात मीटिंग घेऊन मार्गदर्शन केले व काही महत्त्वाच्या सुचना केल्या तसेच ग्रामस्थांना आवाहन केले तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटा व योग्य उपचार करून घ्या या प्रसंगी डॉक्टर श्री हेमंत आहिरराव यांचे श्री तुळशीदास शंकरराव शिंदे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला अशा पध्दतीने मीटिंग पार पडली*

anews Banner

Leave A Comment