Home गुन्हेगारी क्राईम ! आधी अत्याचार केला मग केली अल्पवयीन मुलीची हत्या ! आरोपीच्या...

क्राईम ! आधी अत्याचार केला मग केली अल्पवयीन मुलीची हत्या ! आरोपीच्या शेगावातून मुसक्या आवळल्या!

78
0

आशाताई बच्छाव

1001084908.jpg

क्राईम ! आधी अत्याचार केला मग केली अल्पवयीन मुलीची हत्या ! आरोपीच्या शेगावातून मुसक्या आवळल्या!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलडाणा कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला
ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

23 तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते.

आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती.

अल्पवयीन मुलगी परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली. 24 डिसेंबर रोजी मुलीच्या मृतदेह कल्याणनजीक बापगाव परिसरात सापडला. मुलीच्या
मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटलला पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.
पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचेही नाव समोर आले आहे. विशाल गवळी याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेच्या विरोधात नागरिकांनी आज निषेध मोर्चा काढला. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. विशाल गवळी याला त्याच्या पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous articleअमरावती शहरासाठी १,७१८कोटींची भुयारीगटार योजनाप्रस्तावित,आ.सुलभा खोडके यांचा पाठ पुरावा.
Next articleनेवासा-संगमनेर रोड दुरवस्था व इतर रस्ते: शिवसेना (उबाठा) वतीने धोल नगरपलिकेसमोर बजवो आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here