Home उतर महाराष्ट्र नेवासा-संगमनेर रोड दुरवस्था व इतर रस्ते: शिवसेना (उबाठा) वतीने धोल नगरपलिकेसमोर बजवो...

नेवासा-संगमनेर रोड दुरवस्था व इतर रस्ते: शिवसेना (उबाठा) वतीने धोल नगरपलिकेसमोर बजवो आंदोलन

150

आशाताई बच्छाव

1001085706.jpg

श्रीरामपूर:- दिपक कदम तालुका प्रतिनिधी 
नेवासा-संगमनेर रोड दुरवस्था व इतर रस्ते: शिवसेना (उबाठा) वतीने धोल नगरपलिकेसमोर बजवो आंदोलन

नेवासा-संगमनेर रस्त्याच्या गंभीर दुरवस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने काल नगरपलिकेसमोर ढोल बजवो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते संजय छल्लारे यांनी केले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला सुनावले की, “नेवासा-संगमनेर रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारून नागरिकांसाठी न्याय मिळवेल.” यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “रस्ते दुरुस्त करा” आणि “प्रशासन हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
रस्त्यावरील दुरवस्थेमुळे प्रवाशांच्या हालांची दखल घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा शिवसेनेला अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी दिला गेला.

या आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन, रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. “शिवसेना नेहमीच जनतेसाठी लढत राहील,” असे नेते संजय छल्लारे यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष संजय फंड, मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, व्यापारी असोसिएशनचे सुनील गुप्ता, गौतम उपाध्ये, बाळासाहेब काबिया, योगेश ओझा, संदीप आगरकर,नंदूशेठ कोठारी, संजय कासलीवाल, राहुल कोठारी, प्रेमचंदजी कुंकुलोळ, मुकेश कोठारी, मा. नगरसेवक राजू अदिक, पत्रकार सलीम पठाण सर, नगरसेवक भरत कुंकूलोळ, शरद कोठारी, नगरसेवकआण्णासाहेब डावकर, नगरसेवक आशिष धनवटे, भरत जगदाळे,अशोक बागुल,संजय रूपटक्के, अशोक शिवरकर, नवनाथ जेजुरकर, संजय लाड, चंद्रकांत कर्नावट, सुभाष जंगले, नवनाथ शेळके, श्री नामदे साहेब, कैलास शिंदे, राजेंद्र भोंगळे,राजेंद्र भांबरे, सुरेश कांगुने, संजय आगाशे,बापूसाहेब तुपे, जगन्नाथ हरार, विजय गांधी, चिरायु नगरकर, नजीरभाई शेख, मा. नगरसेवक सुनील बोलके साहेब, सुनील गलांडे,निलेश गोराणे, अमरप्रीत सेठी, मा. नगरसेवक श्याम अडांगळे, निलेश धुस्सा,सुरेश कोळेकर, किरण कर्नावट, दीपक कदम, हरीकृष्ण निर्माळ,नितीन हारदे,धीरज तलवार,संतोष मोरगे,अजय भागवत, मयूर पाटनी,विनीत कुंकूलोळ, निलेश बोरावके, विलास बोरवके,
शिवसेनेचे शहरप्रमुख मा. उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेनेचे ज्येष्ठ अशोक मामा थोरे, तालुकाप्रमुख लखन भगत, सुधीर वायखिंडे, भगवान उपाध्य, शरद गवारे, तेजस बोरावके, युवासेनातालुकाप्रमुख सुरेश थोरे, युवासेनाशहर प्रमुख सिद्धांतभैय्या छल्लारे, रोहित नाईक, विशाल पापडीवाल, विक्रम नाईक, अखिल पठाण, प्रमोद गायकवाड, रोहित भोसले, अजय छल्लारे, प्रकाश परदेशी, योगेश ढसाळ, शुभम छल्लारे, राजू डुकरे, मुस्ताक शेख, विशाल दुपाती, महेश जगताप, गोरख गुळवे, निलेश मटाले, मोती व्यवहारे, देवेन पीडियार, ज्ञानेश्वर सारंधर, विकी गंगवाल, लोकेश नागर, सुहस परदेशी, बापू बुधेकर, दत्ता करडे, प्रवीण शिंदे,व इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते व कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत, “प्रशासन हाय हाय” आणि “रस्ते दुरुस्ती करा” अशा घोषणा दिल्या. आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने शामील झाले होते. शिवसेना नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर येत्या काळात आणखी उग्र आंदोलन केले जाईल, अशी स्पष्ट चेतावणी त्यांनी दिली. नागरिकांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी असून रस्त्यांची समस्या सोडविण्यासाठी हा लढा सुरूच राहील, असे आंदोलकांनी ठामपणे सांगितले.

Previous articleक्राईम ! आधी अत्याचार केला मग केली अल्पवयीन मुलीची हत्या ! आरोपीच्या शेगावातून मुसक्या आवळल्या!
Next articleनेवासे तालुक्यात नाताळ उत्साहात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.