Home उतर महाराष्ट्र नेवासे तालुक्यात नाताळ उत्साहात

नेवासे तालुक्यात नाताळ उत्साहात

91

आशाताई बच्छाव

1001085713.jpg

नेवासे तालुक्यात नाताळ उत्साहात                         नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

सोनई, चांदे, वडाळा बहिरोबा, घोडेगाव व तालुक्यातील विविध प्रमुख गावात ख्रिश्चन बांधवांनी आज नाताळ सणाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम साजरे करत आनंदाचा हा सण उत्साहात साजरा केला.
वडाळा येथील फेअर बँक मेमोरियल प्रार्थनास्थळी सण्डे स्कूलच्या विद्याथ्यर्थ्यांनी
मध्यरात्री येशू ख्रिस्त जन्माचा देखावा सादर केला होता. आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित बांधवांनी भक्तीचा कार्यक्रम करून प्रार्थना केली. बारा वाजता उपासना झाल्यानंतर धर्मगुरु रजनीकांत साळवे यांचे मार्गदर्शन झाले. अनंत नायडू व स्वप्नील ओहोळ यांचे गीतगायन झाले. सचिव सुधीर गिरी, अशोक जेम्स व समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
घोडेगाव, सोनई, चांदे, नेवासे येथील प्रार्थनास्थळी विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊन भजन, मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. प्रार्थनास्थळास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सर्वधर्मीय युवक व ग्रामस्थांनी ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. शालेय विद्याथ्यर्थ्यांना खाऊ व मिठाईचे वाटप करण्यात आले.

Previous articleनेवासा-संगमनेर रोड दुरवस्था व इतर रस्ते: शिवसेना (उबाठा) वतीने धोल नगरपलिकेसमोर बजवो आंदोलन
Next articleफॅमिली डॉक्टर सारखाच फॅमिली शेतकरी निवडावा शेतकरी दिनानिमित्त , शेतकरी बांधवांचा सन्मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.