आशाताई बच्छाव
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ – फँमिली डॉक्टर सारखाच फॅमिली शेतकरी निवडावा
शेतकरी दिनानिमित्त , शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भूमातेचे पूजन व शुद्धीकरणकरून भूमातेचे महत्व सांगण्यात आले यावेळी , जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार करसाईत ,उपविभागीय कृषी अधिकारी अरुण घुमनवार, ,वृक्षमित्र संतोष मुगटकर यांनी सेंद्रिय शेतीमध्ये वृक्षांचे झाडांचे महत्त्व सांगून बांधावर झाडे लावण्यासाठी सांगितले, स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांनी शेतकऱ्यांसाठी मारक असणारे कायदे धोरण बदलून सेंद्रिय शेतीला जास्तीत जास्त मदत देऊन मार्केटिंग ची सोय करावी असे सांगितले भानुदास पेंडकर यांनी शेतकऱ्यांना शाश्वत योगिक शेती विषयक मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सेंद्रिय शेती केली तरच भविष्यात शेती आणि शेतकरी जिवंत असेल, रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमीन नापीक बंजर बनत आहे व मानवी आरोग्य धोक्यात येत आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक शेती बरोबर त्याला जैविक सेंद्रिय शेती ची साथ द्यावी लागेल तर जमिनीची सुपीकता वाढेल खाणाऱ्यांचे आरोग्य, प्रकृती पर्यावरणाचे रक्षण होईल , शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल , देशी गायी बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, या पाठशाळेत शेतकऱ्यांना धनवान व चरित्रवान बनवले जाते.
यावेळी ब्रह्मकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका बी.के. स्वाती बहेणजी म्हणाल्या की, आपण फॅमिली डॉक्टर निवडतो तसाच फॅमिली शेतकरी निवडावा, जेणेकरून आपल्याला विषमुक्त सेंद्रिय अन्नाचा पुरवठा होईल. त्यामुळे आपले शरीर आरोग्य निरोगी राहील, यासह आमच्या ब्रह्मकुमारीज माउंट आबू येथील मुख्यालयात शाश्वत योगिक शेतीचे 3 दिवसीय प्रशिक्षणासाठी उपस्थित शेतकऱ्यांना निमंत्रित केले.
यावेळी राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी माधव कदम, हरिभाऊ कदम कोंढेकर, विश्वनाथ ह़ोळगे, रत्नाकर ढगे, हनुमंत इंगोले, लक्ष्मीबाई सावंत, महानंदा कल्याणकर, अंजना कदम, धोंडीराम सुपारे यांच्यासह 25 शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्देश कृषीभूषण भगवान भाई इंगोले यांनी आपले अनुभव सांगून शेतकऱ्यांनी आता व्यावसायिक शेती केली पाहिजे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी पूजा बहेनजी, यानी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मकुमारी मीना, वनिता, सत्या बहेनजी यांनी परिश्रम घेतले.






