Home विदर्भ क्रांतिकारी संत सेवालाल महाराज जयंती प्रत्येक तांड्यामध्ये जल्लोषात साजरी करा – यश...

क्रांतिकारी संत सेवालाल महाराज जयंती प्रत्येक तांड्यामध्ये जल्लोषात साजरी करा – यश राठोड

843
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_080103.jpg

क्रांतिकारी संत सेवालाल महाराज जयंती प्रत्येक तांड्यामध्ये जल्लोषात साजरी करा – यश राठोड

हिंगोली (संजीव भांबोरे) 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर समाज प्रबोधन महाप्रसाद भोग घरोघरी दिवे लावून येणाऱ्या तरुण पिढीला जागृत करा असे आवाहन समाजसेवक यश राठोड यांनी केलेले आहे .क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज यांची
बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या आईचे नाव धरमणी होते. ती जयराम वडतीया (सुवर्णा कप्पा, कर्नाटक) यांची राजकन्या होती. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे.

सेवालाल महाराज यांचे श्रीक्षेत्र रुईगड येथे निधन झाले. आणि महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबेच्या मंदिराशेजारी आहे. आध्यात्मिक आणि समाजप्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. सेवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही काळाच्या कसोटीवर तंतोतंत खरी ठरली आहे. बंजारा समाजातील महायोद्धा राजा लखीशाह बंजारा, गोर राजाभोज, क्रांतिकारी संत गोविंद गुरू बंजारा ,बाबा मख्खनशाह बंजारा, शूरवीर बल्लुराय बंजारा, वीरांगना मल्लिका बंजारन , गोरा -बादल , आला उदल , नायक मनिसिंह पवार , राजागोपीचंद गोर , वीरांगना दूर्गावती बंजारन , वीर दुर्गादास राठोड , जयमल फत्ता सिंह या शुर पराक्रमीच्या इतिहासाच्या शौर्यगाथा आजही बंजारा साहित्य बरोबरच शिख इतिहासात सुद्धा दिसून येते. माता जगदंबा बंजारा देवी , व्यंकटेश्वर बालाजी , संत हाथीराम बाबा महाराज , संत रूपसिंह महाराज यासह संत सेवालाल महाराज आणि संत सामकी माता यांना समाजात विशेष आस्थेचे स्थान आहे.क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांनी आपल्या गौर बंजारा भाषेत दिलेला उपदेश.

रपीया कटोरो पांळी वक जाय।- भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल।
कसाईन गावढी मत वेचो। – भावार्थः खाटीकला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।
जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो। – भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका।
चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका।
केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका।
जाणंजो छाणंजो पछच माणजो। -भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा।
ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव। – भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल।
संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र व‌ तेलंगाना राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली.असे आव्हान न्यू विजन तांडा फेडरेशन चे संयोजक यश राठोड यांनी केले.

Previous articleभिम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने श्रीरामपूरात मातोश्री रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात
Next article४० मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या; बीडच्या नीता अंधारे यांच्याही बदलीची चर्चा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here