• Home
  • हातकणंगलेत काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको

हातकणंगलेत काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको

 

पेठ वडगांव : हातकणंगले येथे सांगली कोल्हापूर महामार्गावर काँग्रेसच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात देशभर सुरू असलेला विरोध व दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व दिल्लीतील शेतकऱ्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज , व कडाक्याच्या थंडीत पाण्याचा फवारा केल्याबद्दल हातकणंगले येथे तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने निदर्शने करण्यात आली, यावेळी सांगली कोल्हापूर महामार्ग काहीकाळ बंद झाल्याने वाहतूक बंद पडली होती.
यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.
हे सरकार गोरगरीब जनतेच व शेतकऱ्यांच नसुन अंबानी सारख्या उद्योगपतींच आहे.
मोदी सरकारचा जाहीर निषेध करत असताना हातकणंगलेचे नगराध्यक्ष श्री. अरुण जानवेकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री.भगवानराव जाधव, अनु.प्रदेश उपाध्यक्ष श्री बाजीराव सातपुते,सेवादल तालुकाध्यक्ष
श्री तानाजीराव , घोडेस्वार- पाटील,उपाध्यक्ष श्री बाबासो गायकवाड युवक काँग्रेसचे हातकणंगले तालुकाअध्यक्ष कपिल पाटील, तालुका उपाध्यक्ष सुरज जमादार , वडगांव काँग्रेसचे शहरअध्यक्ष सचिन चव्हाण,ओबिसी अध्यक्ष श्री. शकिल अत्तार , हातकणंगले सोशल मिडीया अध्यक्ष राहुल घोडेस्वार , श्री. भैरवनाथ पोवार , बाळासो घाटगे , संतोष नेर्लेकर , तसेच तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क , मोहन शिंदे कोल्हापूर.

anews Banner

Leave A Comment