Home नांदेड देगलूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन.

देगलूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन.

199

आशाताई बच्छाव

IMG_20240201_163050.jpg

देगलूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर :-अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील ग्रंथालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महापुरुषांचे प्रेरणादायी आत्मचरित्र, कथा कादंबरी, शब्दकोश, विश्वकोश, अग्रलेख संग्रह अशा विविध ग्रंथांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि विद्यार्थ्यांनी उत्तम पुस्तके वाचावीत, ग्रंथालयाशी मैत्री जोडावी, त्यातून व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रेरणा घ्यावी, याकरिता पुस्तक प्रदर्शन प्रेरक असते. या करिता दरवर्षीप्रमाणे ग्रंथप्रदर्शन ठेवण्यात आले. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा उत्तमकुमार कांबळे, कार्यालय अधिक्षक श्री गोविंद जोशी, मराठी विभाग प्रमुख डॉ विठ्ठल जंबाले, डॉ सर्जेराव रणखांब, डॉ रत्नाकर लक्षट्टे, डॉ माधव चोले, डॉ संजय देबडे, ग्रंथपाल डॉ साईनाथ शिंदे, सहाय्यक ग्रंथपाल श्रीनिवास नाईक, ग्रंथालय लिपिक श्री भीम कर्णे, कनिष्ठ लिपिक दीपक संगमकर, श्री बालाजी गोविंदवार, श्रीमती रेखा इळेगावकर हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवसभरात मोठ्या संख्येने सदरील प्रदर्शनासाठी भेटी दिल्या.

Previous articleटाकळी विंचूर विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन‌ मोठ्या उत्साहात साजरा —
Next articleघंटागाडीत पुजेचे साहित्य टाकण्यासाठी घंटागाडीमध्ये वेगळी व्यवस्था केल्याबद्दल देगलूर नगर परिषदेचे आभार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.