• Home
  • शिरोळ तालुका काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने

शिरोळ तालुका काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने

 

शिरोळ तालुका काँग्रेसच्या वतीने शिरोळच्या तहसिलदार यांना मोदी सरकार विरोधात निवेदन देण्यात आले , मोदी सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठींबा व शेतकऱ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात निषेध करण्याकरिता शिरोळ तालुका काॅंग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन मोदी सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी शिरोळचे तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष श्री.सर्जेराव शिंदे, शिरोळ तालुका समन्वयक श्री.शेखर पाटील,कोल्हापूर जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष श्री .रणजित पाटील,युवक काँग्रेस शिरोळ तालुका अध्यक्ष फैजल पटेल नगरसेवक योगेश पुजारी, तातोबा पाटील, प.स. सदस्य मिनाज जमादार, मुसा डांगे, सदाशिव पोपळकर, अनंत धनवडे, अमोल चौगुले, विजितसिंह शिंदे, शितल उपाध्ये, महेश परीट, युनुस जमादार यांच्यासह कार्यकर्ते, व शिरोळ मधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क ,मोहन शिंदे कोल्हापूर .

anews Banner

Leave A Comment