Home Breaking News 🛑 चीन – पाकिस्तान ६०० किमी पर्यत उद्‍ध्वस्त करुन ठेवणार – राफेल...

🛑 चीन – पाकिस्तान ६०० किमी पर्यत उद्‍ध्वस्त करुन ठेवणार – राफेल 🛑

95
0

🛑 चीन – पाकिस्तान ६०० किमी पर्यत उद्‍ध्वस्त करुन ठेवणार – राफेल 🛑
✍️देश विदेश 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

देशात विदेश :⭕ बहुप्रतिक्षित राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी आज अंबाला येथे लँड करणार आहे. एअरफोर्स स्टेशनवर यासाठी पुर्ण तयारी करण्यात आली आहे. 3700 किमी मारक क्षमता असलेले 5 राफेल विमान आल्याने हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. अण्वस्त्रांसह अनेक शस्त्रे याद्वारे लाँच करणे शक्य आहे. शस्त्रांच्या स्टोरेजसाठी 6 महिन्यांची गॅरेंटी देखील असेल. याशिवाय राफेलमध्ये रडार सिस्टमवर एक टन कॅमेऱ्याची सुविधा आहे. ही सुविधा या विमानाला इतर विमानांपेक्षा वेगळे बनवते.

रडार सिस्टमवर एक टन कॅमेऱ्याची सुविधा असल्याने याचा निशाणा अचूक असेल. कॅमेरा एवढा संवेदनशील आहे की जमिनीवर कोणत्याही छोट्या केंद्राला याने पाहणे शक्य आहे.

राफेल विमान जवळपास 60 हजार फूट उंचीवरून उड्डाण घेऊ शकते. यामुळे भारतीय हवाई दलाच्या आधुनिकिकरणाला गती मिळेल.

राफेल लढाऊ विमानामुळे हवाई दल अधिक मजबूत तर होईलच शिवाय एअर विजिलेंस देखील अधिक सक्षम होईल. राफेलची रेंज 3700 किमी सांगितली जात आहे. मात्र हवेतच रिफ्यूल करता येत असल्याने, याची रेंज वाढवता येऊ शकते. चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी राफेल भारतीय हवाई दलातील सर्वात खतरनाक शस्त्र आहे. राफेल एअर स्पेस सीमा न ओलांडता पाकिस्तान-चीनच्या 600 किमी आत टार्गेटला पुर्णपणे उद्धवस्त करू शकते.

राफेलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे विमान उड्डाण घेतल्यानंतर 100 किमीच्या कक्षेत 40 टार्गेटवर एकसोबत निशाणा साधू शकते. हे मल्टी डायरेक्शनल रडारमुळे शक्य आहे. टू सिटर राफेल विमानामध्ये पहिला पायलट शत्रूचे टार्गेट लोकेट करेल व दुसरा पायलट लोकेट करण्यात आलेल्या टार्गेटला सिग्नल मिळाल्यानंतर त्याला नष्ट करण्यासाठी विमानातील शस्त्रांना ऑपरेट करेल. राफेल शत्रूच्या विमानाचे रडार देखील जाम करू शकते. राफेल विमानाच्या कॉकपिटमध्ये असे सिस्टम डिझाईन करण्यात आले आहे.

ज्यामुळे युद्धाच्यावेळी पायलटला पुर्ण लक्ष उड्डाणासोबत शत्रूच्या टार्गेटला लक्ष करण्यात देता येईल….⭕

Previous article🛑 दहावी निकाल…! पंढरपूरची सावनी दोशी – राज्यात प्रथम 🛑
Next article🛑 मुख्यमंत्री खुद्द करणार पुणे दौरा….! 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here