• Home
  • 🛑 दहावी निकाल…! पंढरपूरची सावनी दोशी – राज्यात प्रथम 🛑

🛑 दहावी निकाल…! पंढरपूरची सावनी दोशी – राज्यात प्रथम 🛑

🛑 दहावी निकाल…! पंढरपूरची सावनी दोशी – राज्यात प्रथम 🛑
✍️पंढरपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पंढरपूर :⭕मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने नुकताच जाहीर झाला. यात कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सावनी तारकेश्वर दोशी हिने १०० टक्के गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.

पंढरपूर तालुक्याचा निकाल ९७.५६ टक्के ऐवढा लागला असून कवठेकर प्रशालेचा निकाल ९६.६६ टक्के लागला आहे.
यामध्ये सावनी दोशी १०० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.

त्याचबरोबर आशिर्वाद राजेश्‍वर कटकमवार ९८.६० टक्के प्रशालेत द्वितीय, सायली नरेंद्र भांडार कवठेकर ९८.४० टक्के तृतीय क्रमाने उत्तीर्ण झाले आहे.

९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या २१ असून ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांची सख्या ७३ इतकी आहे.

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक, अध्यक्ष वा. ना. उत्पात, संस्थेचे सचिव मो.चि. पाठक, वा. गो. भाळवणकर, पदाधिकारी नानासाहेब रत्नपारखी, सु. र. पटवर्धन व सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एस. पी. कुलकर्णी उपमुख्याध्यापिका अंजली बारसावडे, पर्यवेक्षक व्ही. एम. कुलकर्णी, आर. जी. केसकर, एन. बी. बडवे सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले….⭕

anews Banner

Leave A Comment