Home Breaking News 🛑 मुख्यमंत्री खुद्द करणार पुणे दौरा….! 🛑

🛑 मुख्यमंत्री खुद्द करणार पुणे दौरा….! 🛑

108
0

🛑 मुख्यमंत्री खुद्द करणार पुणे दौरा….! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोनाने मुंबई पाठोपाठ पुण्यातही कहर घातला असून पुण्यातील आकडे हि अजून आटोक्यात नसल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून समजत आहे. आता केंद्राचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे स्वतः लक्ष घालून येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लक्ष घालणार आहेत.

मुख्यमंत्री देखील याच पार्श्वभूमीवर पुण्याचा आढावा दौरा करणार आहेत.

विभागीय आयुक्तांसह जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू.

असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत व्यक्त केला तसेच, आता जिल्ह्यातील सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या असून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या दोन दिवसात पुण्याला भेट देणार आहेत.

त्यांच्या या भेटीमुळे या लढाईला निश्चित बळ मिळेल, असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हणाले की, पुण्यात ‘कोरोना’च्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.

पुणे शहर, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात काल संध्याकाळी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जमाबंदी आयुक्त तथा ‘ससून हॉस्पिटल’चे समन्वयक एस. चोक्कलिंगम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हे देखिल प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते….⭕

Previous article🛑 चीन – पाकिस्तान ६०० किमी पर्यत उद्‍ध्वस्त करुन ठेवणार – राफेल 🛑
Next article*खालप गावात निर्ज्तंनाशक फवारणी* खालप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here