Home पुणे ती म्हणाले खाऊ नको मला पुस्तक द्या

ती म्हणाले खाऊ नको मला पुस्तक द्या

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0067.jpg

ती म्हणाले खाऊ नको मला पुस्तक द्या

शिक्षणाच्या आवडीने झाले मायलेकीचे भेट सामाजिक कार्यकर्ता पुढाकार घेणारे ॲड. सुरेखा पाटोळे आणि पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांनी दाखल घेतली आणि एका मुलीला न्याय दिला.
पिंपरी /पुणे,प्रतिनिधी उमेश पाटील
अन्नदान करताना सामाजिक कार्यकर्ता निदर्शनात भीक मागणारी दहा वर्षीय मुलगी आली. तिच्याची संवाद साधला असता ती म्हणाली – “मला खाऊ नको पण पुस्तक द्या” चौकशी केली असता तिच्या वर ओढववेला प्रसंग समजला. हालचाली करून मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिले. संगीता (मुलीचे नाव बदललेले) हे मुळशी जालना जिल्ह्यातील वडिलांचे आणि आईचे पटत नसल्यामुळे, आई आणि वडील दोघेही विभक्त झाले. व्यसनी वडिलांच्या मुलीला जबरदस्तीने तिला विविध शहरांमध्ये भीक मागण्यासाठी भाग पाडले. ह्या प्रकारे सर्व उलगडा निगडी येथील एका शाळेतर्फ बेघरांसाठी अन्न वाटप करण्यात येत होते. तेथील एका शिक्षिकेला झाला. संगीता भीक मागत असलेल्या ठिकाणी ते आले त्यावेळी तिने खायला नाही तर मला मला पुस्तके द्या असे सांगितले, त्यातून संगीताच्या शिक्षणाची आवड लक्षात आली. त्यामुळे शिक्षिकेने “सहभागी फाउंडेशनच्या” प्राजक्ता रुद्रवार यांना संगीताचा फोटो पाठविला. तिच्या शिक्षणाची व्यवस्था करता येईल का असेच शिक्षकाने विचारले.
विश्वजीत खुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी यांना माहिती मिळाली संगीताला निगडीतून संभाजी चौकातून सोडण्यात आले. तिला रविवारी एका दिवसातून बालसुधारगृहात ठेवण्यात आले सोमवारी बाल कल्याण समिती समोर तिला नेण्यात आले. बालकल्याण समितीचे निर्णयानुसार तिला आईच्या ताब्यात देण्यात आले
अन ही तीच निघाली.
काही दिवसापासून संगीता हरवल्याचा मेसेज प्राजक्ता रुद्रावर सुधीर करंडे यांना मिळाला होता तो फोटो आणि शिक्षकाने पाठवलेला फोटो साम्य असल्याच्या त्यांच्या लक्षात आले त्यांनी निगडी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी रविवारी संगीताला संभाजी चौकातून ठाण्यात आणले प्राथमिक माहिती घेऊन आईकडून माहिती घेतली. बालकल्याण समितीशी ॲड.सुरेखा पाटोळे व ॲड. विशाल ओव्हाळ यांनी संपर्क साधला . एका दिवसासाठी संगीताची राहण्याची व्यवस्था केली
सहभागी फाउंडेशन सुधीर करंडे
संगीता हरवल्याची माहिती मीडिया वरून मिळाली होती, त्यामुळे शहरात तिचा शोध घेतला होता, आता मिळालेला फोटो तीच असल्याचे खात्री झाली असें फाउंडेशनचे सुधीर करंडे म्हणाले
ॲडव्होकेट: सुरेखा पाटोळे म्हणाले शिक्षण हा मुलांचा मूलभूत अधिकार आहे त्यांना तो मिळावा यासाठी आम्ही आग्रही होतो. मुलींच्या आईशी बोलून तिला बालगृहात ठेवण्यात येणार आहे असे सुरेखा पाटोळे म्हणाल्या.

Previous articleसप्तश्रृंगी देवी मंदिराचे होणार नूतनीकरण
Next articleमराठवाड्याच्या उर्जिता व्यवस्थेसाठी विकास प्रकल्पांची गरज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here