Home नाशिक सप्तश्रृंगी देवी मंदिराचे होणार नूतनीकरण

सप्तश्रृंगी देवी मंदिराचे होणार नूतनीकरण

164

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0076.jpg

सप्तश्रृंगी देवी मंदिराचे होणार नूतनीकरण

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

साडेतीन शक्तीपीठातील एक असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवी मंदिराचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचा सुतोवाच सप्तशृंगी देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वतीने अड. ललित निकम यांनी केले. सुयश हॉस्पिटल व सप्तशृंगी देवस्थान मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद घेणार आली. त्यावेळी सदरची माहिती देण्यात आली.
यावेळी मंदिर विकासाची माहिती देताना 22 चौरस फुटामध्ये मंदिराची पुनर्निर्मिती केली जाणार असून मागील 30 ते 40 वर्षांनंतर कामाला प्रारंभ केला जाणार आहे कायदेशीर सोपासकार परवानगी सर्व पूर्ण झाले असून येत्या महिन्याभरात मंदिर उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे यात प्रामुख्याने मंदिराच्या गाभाऱ्याला चांदीचे आवरण लावले जाणार असून येत्या पाच ते सहा महिन्यात गाभाऱ्याचं सुशोभीकरण केले जाईल या सोबतच देवीच्या मूर्तीवरून काढण्यात आलेल्या शेंदुराचा स्तंभ उभारला जाणारा असून तो मंदिराच्या पहिल्या पायरी जवळ उभारण्यात येणार आहे रोपवे समोर प्रशासकीय कार्यालय तसेच इतर समन्वय कार्यालय उभारले जाणार आहेत तलावाच्या सुशोभीकरणासाठी जन संग्रहातून खर्च केला जाणार आहे भाविकांच्या सहयोगातून सुशोभीकरण केले जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Previous articleकाय आहे व-हाणे प्रकरण..पत्रकार भवन जागेचा मुद्दा का गाजतोय सर्वत्र!
Next articleती म्हणाले खाऊ नको मला पुस्तक द्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.