Home नाशिक मेशीच्या गणेशनगर परिसरात बिबटयांचे दर्शन;नागरीकात घबराटीचे वातावरण

मेशीच्या गणेशनगर परिसरात बिबटयांचे दर्शन;नागरीकात घबराटीचे वातावरण

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20231004-WA0130.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
देवळा प्रतिनिधी :-मेशी ता.देवळा येथील गणेशनगर परिसरात घडले बिबट्याचे दर्शन. परिसरात घबराट वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.
येथील गणेशनगर परिसरात मंगळवारी(दि.३)रोजी दिवसभर वाजेच्या सुमारास पांडुरंग बोरसे हे दुसऱ्या शेतात कामानिमित्त गेले होते तेथून काम आटोपून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते आपल्या राहत्या घरी आले असता त्यांनी त्यांच्या घराच्या ओट्यावर बिबट्या झोपलेल्या अवस्थेत दिसून आला बोरसे यांनी तात्काळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलविले असता बिबट्या तिथेच झोपेलेला होता नागरिकांनी आरडाओरडा केला असता बिबट्या त्याठिकाणाहून न जाता डरकाळी फोडत होता . त्यानंतर काही वेळात तिथून हळूहळू जवळच असलेल्या मका शेतात बिबट्या निघून गेला त्यानंतर माजी सरपंच बापू जाधव यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून काही वेळाने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले रात्रीची वेळ असल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांनी रात्रभर सुरक्षित स्थळी जाण्यास सांगून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या .त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच वनविभागाचे जी जी पवार वनरक्षक मेशी , देविदास चौधरी वनपाल उमराणे बिट
,ईश्वर ठाकरे वनकर्मचारी, दादाजी ठाकरे वनकर्मचारी हे दाखल होत त्यांनी मक्याच्या शेतात बिबट्या असल्याच्या पाऊलखुणा बघितल्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मादी जातीच्या बिबट्यासोबत पिलं देखील असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे त्यानंतर दुपारी ४ वाजता त्याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असून वनविभागामार्फत एक वनरक्षक तेथे ठेवण्यात आल्याची माहिती वनपाल देविदास चौधरी यांनी दिली आहे

Previous articleशिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांनी नव्याने नाव नोंदविण्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचे आवाहन
Next articleतिलक वैद्य यांची सचिव पदी निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here