Home जळगाव शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांनी नव्याने नाव नोंदविण्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचे आवाहन

शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांनी नव्याने नाव नोंदविण्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचे आवाहन

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20231004-WA0134.jpg

शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांनी नव्याने नाव नोंदविण्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचे आवाहन
चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यंाचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणी कार्यक्रम जाहिर झाला आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी तालु्नयातील जास्तीत जास्त शिक्षकांनी नाव नोंदवावे. असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक निवडणुक अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले आहे.
तहसील कार्यालयात आज बुधवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत तहसीलदार पाटील यांनी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी परिक्षाविधीन तहसीलदार जगदीश भटकर, निवडणुक नायब तहसीलदार संदेश निकुंभ उपस्थित होते. यांनी केले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नोंदणी 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी सर्वसाधारण निवासी असलेले आणि 1 नोव्हेंबर 2023 पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज क्रमांक 19 भरून, त्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही.असेही त्यांनी सांगितले. मागील निवडणुकीत तालु्नयात 1400 मतदार होते असे त्यांनी सांगितले.
या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमानुसार 30 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध झाली आहे तर सोमवार 16 ऑक्टोंबर, 2023 रोजी मतदार नोंदणी अधिनियमान्वये नोटिसीची प्रथम पुर्नप्रसिद्धी केली जाईल. बुधवार 25 ऑक्टोंबर रोजी द्वितीय नोटीस पुर्नप्रसिद्धी केली जाईल. नमुना 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक सोमवार 6 नोव्हेंबर 2023 असेल. सोमवार 20 नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या गुरुवार 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. 25 डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि शनिवार 30 डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.तालु्नयातील शिक्षकांनी 100 टक्के मतदार नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यंानी केले आहे.
मतदार नोंदणीसाठी अर्ज आपल्या शाळा / महाविद्यालयांना देण्यात येत आहेत. त्यानुसार आपल्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षक / प्राध्यापक यांना अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदार नोंदणी अर्ज आपल्या लेटरपॅडवरील पत्र व यादीसह ते पदनिर्देशित सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी म्हणजे तहसिलदार यांच्याकडे जमा करणेत यावेत.असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

Previous articleपाटणा देवी दर्शनाला जाण्यासाठी पुल नाही…. पुरातन विभाग मुद्दाम याकडे दुर्लक्ष करत आहे – सरपंच नितीन पाटील..
Next articleमेशीच्या गणेशनगर परिसरात बिबटयांचे दर्शन;नागरीकात घबराटीचे वातावरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here