Home उतर महाराष्ट्र भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदार नोंदणी होणे गरजेचे

भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदार नोंदणी होणे गरजेचे

104

आशाताई बच्छाव

IMG_20240127_064314.jpg

श्रीरामपूर,(प्रतिनिधी  दिपक कदम): भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदार नोंदणी होणे गरजेचे आहे.कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये यांकरिता अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांनी दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी मोलाचे योगदान दिले दिव्यांग व्यक्ती करिता त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.मतदार नोंदणी केल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार आंपण वापरला पाहिजे.असे प्रतिपादन राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले.
मतदार नोंदणी अधिकारी 220 श्रीरामपूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ संघ श्रीरामपूर,प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय,राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना आणि सी.डी.जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा सी डी जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
दिव्यांग मतदार जनजागृती अभियान राबवून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्रीरामपूरच्या आसान दिव्यांग संघटनेला निवडणूक मित्र पुरस्कार संघटनेचे संस्थापक संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड यांना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंद कुमार वाघ,सी डी जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर,अँड.प्रसन्ना बिंगी यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी डी जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ सुहास निंबाळकर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पिंगळे सर यांनी केले तर आभार सौ पाटील मॅडम यांनी मानले

Previous articleसंगमनेर आगारांतर्गत प्रवासी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत आगार प्रमुखांना निवेदन
Next articleबाबुराव पाटील सानप यांची वंजारी महासंघ किसान आघाडी प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.