आशाताई बच्छाव
बाबुराव पाटील सानप यांची वंजारी महासंघ किसान आघाडी प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड
वंजारी महासंघाने दिली दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी—
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रभर प्रचार प्रसार करणाऱ्या व महाराष्ट्रभर नावलौकिक मिळविलेल्या विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचचे मुख्य सदस्य तसेच शिवडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन बाबुराव किसन पाटील सानप (सोनेवाडी) यांची वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत ,लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक, साहित्यिक गणेश जी खाडे बीड यांच्या आदेशानुसार विशेष कार्याची वंजारी महासंघाने दखल घेत पुन्हा एकदा वंजारी महासंघाच्या किसान आघाडी प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती राज्य संपर्कप्रमुख खंडेश्वर मुंडे (पुणे) यांनी बाबुराव पाटील सानप यांना वंजारी महासंघ किसान आघाडी प्रदेशाध्यक्ष नियुक्तीपत्र देण्यात आली आहे.
स्वधर्म रक्षण व राष्ट्र निर्माणात योगदान ही कर्तव्य आणि जबाबदारी असून नैतिक मूल्य रक्षणासोबतच संस्कृती व संस्कारक्षम पिढीच्या निर्माणासाठी एक पाऊल सामाजिक संस्कृती टिकविण्यासाठी आपण आजवर केलेल्या अनमोल कार्याची दखल घेऊन आपली निवड करण्यात येत असून आपण सुसंस्कृत समाज व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी नक्कीच योगदान द्याल.
आपण यापुढेही सामाजिक क्षेत्रात नवनवीन बदलांसह भावी पिढीला नवी दिशा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य कराल असा मला विश्वास वाटतो असे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
या निवडीबद्दल ज्येष्ठ लेखक साहित्यिक अध्यात्मिक मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष गणेश जी खाडे बीड, साहित्यिक आघाडी मार्गदर्शक प्राध्यापक वा ना आंधळे एरंडोल, राज्य संपर्कप्रमुख खंडेश्वर मुंडे पुणे, राज्य सरचिटणीस सूर्यभान बाबुराव गोरे संगमनेर, दत्तात्रय मारुती चवदार तासगाव, राज्य संघटक भास्कर खंडेराव सांगळे जिंतूर, आदींसह सर्व आघाडी मार्गदर्शक, प्रदेशाध्यक्ष ,उपाध्यक्ष, सरचिटणीस व सर्व पदाधिकारी, वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर निफाड, रामायणाचार्य तथा विठ्ठल रखुमाई ग्रुप मुख्य मार्गदर्शक ह भ प भास्कर नाना रसाळ आहेरगाव, सौ शुभदाताई लोहार सांगली, भागवत कथाकार ह भ प विठोबा दादा आवारे शिरवाडे रामायणाचार्य विनायक महाराज वाघ धामोरी, विठ्ठल रखुमाई ग्रुपचे मुख्य संचालक शंकरराव कोल्हे नैताळे, भागवताचार्य हभप सिमाताई राजेंद्र काळे चांदवड, सौ कांताताई इंगळे/ जाधव घाटकोपर, प्राचार्य सी डी रोटे वनसगाव, लक्ष्मण आवारे सर चांदवड, नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे,सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, भास्कर आबा मांजरे धामोरी, साहेबराव आण्णा कुयटे आहेरगाव, शंकर भवर,अरुण भाऊ घायाळ, नंदू भाऊ कातकाडे ,सौ वैशालीताई दौंड शिवडी,सौ मनीषा दिपक भोर ,सौ जयश्री चव्हाण, सौ वैशाली डुंबरे, सौ अर्चनाताई दत्तात्रय शिंदे, सौ मनिषाताई बाळासाहेब निफाडे,सौ सुवर्णा खालकर,सौ जयाताई निचीत, रामेश्वर पाटील , विठ्ठलराव कोटकर साहेब नैताळे, मधुकर आप्पा शिंदे वनसगाव, पोपटराव मोरे दावचवाडी, भास्कर आप्पा गारे खानगाव, देविदास गुडघे पाटील ममदापूर, सविता मंडलिक ओझर, मालती होळकर लासलगाव, शलाका कुलकर्णी भुसावळ आदींनी अभिनंदन केले आहे.






