Home नांदेड देगलुर नगर परिषदेच्या हद्दीतील उद्यानास छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख थांबवा –...

देगलुर नगर परिषदेच्या हद्दीतील उद्यानास छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख थांबवा – देगलुर शिवसेना (शिंदे गट )शहर संघटक धनाजी जोशी.

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240127_065723.jpg

देगलुर नगर परिषदेच्या हद्दीतील उद्यानास छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख थांबवा – देगलुर शिवसेना (शिंदे गट )शहर संघटक धनाजी जोशी.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

उपजिल्हा देगलुर शहरातील त्रिवेणी संगम च्या मुख्य चौकातील उद्यानाला श्री छत्रपती शिवाजी उद्यान असे एकेरी उल्लेख असलेले नाव निदर्शनास आले असुन, त्या गोष्टी कडे शासनाचे व लोकनेते यांचे दुर्लक्ष, असल्याचे स्पष्ट पणे दिसुन येत आहे. या एकेरी उल्लेख केलेल्या नावाचा संतप्त राग शिवप्रेमी मध्ये दिसुन येत असुन जनतेमध्ये देखील रोष निर्माण झाला आहे. या गोष्टीचे तातडीने दखल घेऊन सर्व शिवप्रेमी यांना शहरातील शिवसेना शिंदे गट शहर संघटक धन्नु भाऊ जोशी यांनी विनंती करुन मी स्वत यागोष्टी कडे लक्ष देतो असे सांगून तुम्ही काळजी करू नका असे आश्वासन देऊन तुम्ही इतर कोणतीही त्रासजनक पाऊले उचलू नका. तुम्हाला व इतरांना त्रास होईल असे पाऊल टाकू नका असे बोलून या अपमानास्पद एकेरी उल्लेख असलेले नावाच्या फलकाचे मुख्याधिकारी साहेब यांना भेटून त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर या गंभीर विषयाबाबत स्वत मुख्याधिकारी साहेबांनी मी स्वत लक्ष देऊन तातडीने हे नाव बदलुन श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असे पूर्ण नाव फलकावर छापून देतो असे आश्वासन दिले. व संबंधित विषयावर साहेबांनी लक्ष वेधून संबंधीत व्यक्ती वर कडक कारवाई करावी व त्यांना पुन्हा अशी चुक होऊ नये म्हणून लेखी पत्र लिहून घ्यावे. व पुर्ण नाव व्यवस्थित लिहून असलेले फलक लावण्यात यावे. अन्यथा सर्व शिवप्रेमी तथा स्वत शिवसेना शहर संघटक धन्नु भाऊ जोशी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल. व अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी हि शासनाची असेल असा इशारा देगलूर शिवसेना शिंदे गट शहर संघटक धन्नु भाऊ जोशी यांनी दिले.

Previous articleबाबुराव पाटील सानप यांची वंजारी महासंघ किसान आघाडी प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड
Next articleसाकोलीत विधवा महिलांनी सतर्क रहावे-तहसील व पोलीस प्रशासनाचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here