Home जालना ओबीसी समाजाच्या आर्थिक योजनेकडे  शासनाचे दुर्लक्ष ः कल्याण दळे

ओबीसी समाजाच्या आर्थिक योजनेकडे  शासनाचे दुर्लक्ष ः कल्याण दळे

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20230607-WA0127.jpg

ओबीसी समाजाच्या आर्थिक योजनेकडे
शासनाचे दुर्लक्ष ः कल्याण दळे
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः ओबीसी आर्थीक विकास महामंडळ आणि महाज्योती योजना राज्य शासन प्रभाविपणे राबवित नसल्यामुळे ओबीसी समाजातील सुशिक्षीत बेकारावर मोठा अन्याय होत असून सदरील महामंडळांना वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ओबीसी व्हिजेएनटी बहुजन विकास परिषदेचे कार्याध्यक्ष कल्याण दळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
ओबीसी विकास महामंडळाच्या विविध योजना असतांना देखील ओबीसी समाजाच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. शासनाने या महामंडळाला वाढीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू प्रत्येक्षात मात्र हा निधी देण्यात आलेला नाही. शासनाच्या महाज्योतीच्या योजना देखील तत्परतेने अंमलबजावणी होत नाही. शासनाने याकडे देखील जाणून बुजून कानाडोळा केलेला आहे अशी टिका परिषदेचे नेते श्री दळे यांनी पत्रकात नमूद केली आहे. वाढती बेरोजगारी पहाता शासनाने केंद्र शासनाच्या मुद्रा लोन गरजवंतांना न देता भाजपाच्या कार्यकर्त्यांना वितरीत करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे समाजातील गरजू आणि होतकरू बेकारांना याचा लाभ मिळू शकला नाही. यामुळे खऱ्या गरजूवंतांना या योजनेपासून वंचित राहावे लागले असल्याची खंत श्री दळे यांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या कौशल्य विकास योजनेचे देखील तीन-तेरा वाजलेले असल्याचे दिसून येत आहे. या योजनेच्या देखील अनेक तक्रारी असतांना शासनाने याबाबीकडे गंभीरतेने बघीतलेले नाही. यामुळे बारा बलुतेदार समाजावर अन्याय झालेला आहे. शासनाने हा अन्याय त्वरीत दुर करावा अशी मागणी श्री दळे यांनी केली आहे. एकुणच केंद्र आणि राज्य शासनाच्या ओबीसी समाजाच्या संदर्भातील योजना ह्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आहेत. यामुळे ओबीसी समाजामध्ये आणि विशेष करून

Previous articleविशेष लेख  प्रधानमंत्री कुसुम योजना सौर कृषी पंपाव्दारे शेतीला मुबलक पाणी
Next articleनवनियुक्त भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याने सौ,रेखाताई डोळस यांचा सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here