• Home
  • खालप विकास सोसायटीत अपहार ; तत्कालीन सचिव व मदतनीस विरोधात गुन्हा दाखल

खालप विकास सोसायटीत अपहार ; तत्कालीन सचिव व मदतनीस विरोधात गुन्हा दाखल

खालप विकास सोसायटीत अपहार ; तत्कालीन सचिव व मदतनीस विरोधात गुन्हा दाखल
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
देवळा : तालुक्यातील खालप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सण २०११ ते २०१७ च्या केलेल्या लेखापरीक्षण अहवालात अपहार तसेच अफरातफर केल्याचे आढळून आल्यावरून संस्थेचे तत्कालीन सचिव पोपट उशिरे व मदतनीस समाधान सूर्यवंशी यांना जबाबदार धरून नवनाथ बोडके , लेखापरीक्षक ,सहकारी संस्था देवळा यांनी देवळा ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . या फिर्यादीवरून मंगळवारी(दि ४ ) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी दिली . याबाबत लेखापरीक्षक बोडके यांनी देवळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केलेली अधिक माहिती अशी की , देवळा तालुक्यातील खालप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सण २०११/१२ ते सण२०१७/१७ या कालावधीचे चाचणी लेखापरीक्षण पूर्ण केलेले असून ,संस्थेत ५८ लाख ३६ हजार २४४ रुपये एवढ्या रकमेचा अपहार झालेला असून , सदर अपहारास संस्थेचे तत्कालीन सचिव पोपट दगडू उशीर व मदतनीस समाधान पंडित सूर्यवंशी हे वयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार आहेत . सदर आरोपींनी संस्था , संस्थेचे सभासद, संचालक मंडळ व कर्जदार यांचा विश्वासघात करणे , खोट्या नोंदी करणे,रोख रकमेचा अपहार करणे अशा प्रकारे ५८ लाख ,३६ हजार ,२४४ रुपयांची फसवणूक केलेली आहे . म्हणून माझी शासनाच्या वतीने नमूद आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्यासाठी तक्रार आहे . पुरावा म्हणून अफरातफर, अपहराचा अहवाल सहायक निंबधक सहकारी संस्था देवळा यांचे अभिमतची साक्षांकित प्रत व जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था, नाशिक यांचे पत्र जोडून देवळा पोलिसांत शासनाच्या वतीने कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे . यावरून खालप विकास संस्थेचे सचिव व मदतनीस यांनी कार्यरत असतांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संस्थेच्या दैनंदिन कामकाजातील रकमेचा अपहार करून सभासद व भागधारक यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास पोलीस अधीक्षक सुहास देशमुख करीत आहेत .

anews Banner

Leave A Comment