Home Breaking News **आयटी क्षेत्रात एक लाख रोजगाच्या संधी:

**आयटी क्षेत्रात एक लाख रोजगाच्या संधी:

127
0

**आयटी क्षेत्रात एक लाख रोजगाच्या संधी:✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)**
भारतातील आयटी कंपन्या आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती करण्याच्या तयारीत आहेत. टॉप कंपन्या देशभरात कमीत कमी एक लाख भरती करणार आहेत, त्यामुळे आयटी क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. क्लाइंट कंपन्यांनी त्यांचे काम आऊटसोर्सिंग करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांना नवीन नोकरी भरती करणार आहेत.
पहिल्या तिमाहीमध्ये भरती रोखल्याने आता या कंपन्यांनी वेगाने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस यावर्षी ४० हजार नवीन भरती करू शकते.इन्फोसिस २० हजार आणि एचसीएल १५ हजार भरती करेल. कॉग्निझंट देखील १५ हजार भरतीची तयारी करीत आहेत.
जेनसर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात त्यांनी पाच लोकेशन फ्रेशर्स भरती केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कंपन्यांनी भरती केली नसल्याने बरीच जागा भरायच्या बाकी आहेत. गेल्या काही महिन्यांत आयटी कंपन्यांच्या महसुलात घट झाली होती. पण आता परिस्थिती हळूहळू सुधारत चालली आहे. महसूल वाढत असल्यानं कंपन्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचे डिजिटलायझेशन होत असल्याचे आयटी कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यांचे बरेच काम डिजिटल माध्यमातून केले जात आहे. म्हणून कमाईची चांगली शक्यता आहे. कोरोनामुळे डिजिटल परिवर्तनाची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहिल्यावेळी बँकिंग क्षेत्रातील डिजिटल रूपांतरणाचा प्रोजेक्ट १२-१३ महिन्यात पूर्ण झाला होता, तो आता २-३ महिन्यांत पूर्ण होत आहे. आयटी कंपन्यांच्या म्हणण्यानुसार मध्यम व वरिष्ठ पातळीवरही मोठ्या प्रमाणात भरती होत आहेत.

Previous article*मराठा क्रांती मोर्चाचे शिलेदार बहिणीला न्याय देण्यासाठी रोह्याला पोहोचले*
Next articleखालप विकास सोसायटीत अपहार ; तत्कालीन सचिव व मदतनीस विरोधात गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here