• Home
  • *मराठा क्रांती मोर्चाचे शिलेदार बहिणीला न्याय देण्यासाठी रोह्याला पोहोचले*

*मराठा क्रांती मोर्चाचे शिलेदार बहिणीला न्याय देण्यासाठी रोह्याला पोहोचले*

*मराठा क्रांती मोर्चाचे शिलेदार बहिणीला न्याय देण्यासाठी रोह्याला पोहोचले*
रायगड,( अक्षय जाधव ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
तांबडी गाव, रोहा येथील मराठा म्हांदळेकर कुटुंबियांच्या 14 वर्षाच्या लेकीवर काही नराधमांनी 26 जुलै रोजी लैंगिक अत्याचार करून तिचा निघृण खून केला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या सदरच्या गुन्ह्यातील 7 आरोपींना रोहा पोलीसांनी अटकही केली आहे. परंतु एवढे भयानक प्रकरण घडूनही त्याची वाच्यता कुठेही झाली नाही वा त्याची पाहिजे तशी दखल मात्र घेतली गेली नाही.

मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्राचे शिलेदार श्री राजन घाग, श्री प्रफुल्ल पवार, श्री रुपेश मांजरेकर, श्री विलास सुद्रीक, श्री विशाल सावंत, श्री विवेक सावंत, श्री भागवत पानसरे, श्री चंद्रकांत चाळके, श्री चेतन कोरे म्हांदळेकर कुटुंबियांना धीर देण्यासाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी आणि सदरच्या प्रकरणी बळी गेलेल्या मराठा मुलीला, बहिणीला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी तांबडी गाव, रोहा येथे घरचे रक्षाबंधन सोडून पोहोचले.

*’तर 60 वा मराठा क्रांती मोर्चा तांबडी गावातून निघेल’ – श्री राजन घाग यांचा सरकारला इशारा*
त्याप्रसंगी मराठा समाजाचे स्थानिक प्रतिनिधी व तेथील प्रतिष्ठित मंडळी बरोबर होती. श्री राजन घाग आणि इतर मराठा क्रांती मोर्चाचे सर्व प्रतिनिधी यांनी म्हांदळेकर कुटुंबियांची तसेच स्थानिक ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी श्री राजन घाग यांनी सदरच्या प्रकरणात पीडित ताईला न्याय मिळाला पाहिजे, सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी व त्यांना फाशी द्यावी अशी मागणी केली, त्याचप्रमाणे जर सरकारने या केसमध्ये हयगय केली, प्रकरण दाबून टाकण्याचा वा त्यात चालढकल करण्याचा प्रयत्न केल्यास 60 वा मराठा क्रांती मोर्चा तांबडी गावात काढावा लागेल असा सरकारला इशारा दिला. रोहा येथील जिल्हा पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन सदरच्या केसच्या प्रगतीबाबत, तपासाबाबत अधिक माहिती घेतली व समाजातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

anews Banner

Leave A Comment