Home सामाजिक विशेष लेख  प्रधानमंत्री कुसुम योजना सौर कृषी पंपाव्दारे शेतीला मुबलक पाणी

विशेष लेख  प्रधानमंत्री कुसुम योजना सौर कृषी पंपाव्दारे शेतीला मुबलक पाणी

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20230608-WA0040.jpg

विशेष लेख

प्रधानमंत्री कुसुम योजना

सौर कृषी पंपाव्दारे शेतीला मुबलक पाणी

 

शेती करताना शेतकऱ्यांना विज अखंडपणे मिळावी म्हणून सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याकरीता  शासनाने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरु केली आहे. या  अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  यामुळे ज्यावेळी पिकांना पाणी आवश्यक असेल त्यावेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी  देता येणे शक्य होणार आहे.

केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दि. 22 जुलै, 2019 रोजी पीएम-कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. राज्य शासनाने 12 मे, 2021 रोजी या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला असून या योजनेतंर्गत दरवर्षी 1 लाख नग या प्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 5 लक्ष सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले.

असा असेल लाभार्थी हिस्सा – पीएम कुसूम योजनेतंर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध होणार आहेत. पीएम कुसूम योजनेतंर्गत 3 एच.पी. पंपासाठी पंपाची किंमत जीएसटी सह 1 लाख 93 हजार 803 असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा 19 हजार 380,अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा 9 हजार 690 इतका राहील. 5 एच.पी पंपासाठी पंपाची किंमत जीएसटी सह 2 लाख 69 हजार 746 असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा 26 हजार 975 ,अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा 13 हजार 488 इतका राहील. 7.5 एच.पी. पंपासाठी पंपाची किंमत जीएसटी सह 3 लाख 74 हजार 402 अशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here