आशाताई बच्छाव
चांदोरी न्युज इंग्लिश स्कूल ला कर्मवीर पारितोषिक व आदर्श विद्यालय पुरस्कार प्रदान
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब यांचे हस्ते पुरस्कार वितरण
दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे
रयत शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील न्यू इंग्लिश विद्यालयास सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात कर्मवीर समाधी परिसराशेजारी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब यांचे हस्ते
रयत शिक्षण संस्थेचा आदर्श विद्यालय पुरस्कार व कर्मवीर पारितोषिक प्रदान करण्यात आले.
तत्पूर्वी आयोजित सभेच्या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची आजवरची वाटचाल सादर केली. तसेच संस्थेचे सचिव शिवणकर साहेब यांनीही रयत शिक्षण संस्थेच्या प्रास्ताविकेत संस्थेच्या विकासाचे विविध टप्पे उपस्थितांसमोर मांडले. यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पदवीव्युत्तर पदवी, व विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन 2022- 23 मध्ये संस्थेच्या विविध विद्यालयातील आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तर रयत शिक्षण संस्थेच्या पाचही विभागातून अव्वल अशा विद्यालयांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये निफाड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर सुभाष सोमवंशी तसेच विद्यालयातील उपस्थित शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन कर्मवीर पारितोषिक व आदर्श विद्यालय पुरस्काराद्वारे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील साहेब, व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे साहेब तसेच मॅनेजिंग कौन्सिलचे सर्व सदस्य, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार साहेब, दिलीप वळसे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार रामशेठ ठाकूर साहेब, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आशुतोष दादा काळे, मीनाताई जगधने, प्रशांत ठाकूर व आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच चांदोरी ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य माणिक शेठ गायखे, माजी प्राचार्य लोंढे सर उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सोमवंशी सर, पर्यवेक्षक वसावे सर, उपशिक्षक विष्णू कोरडे, वसंत टर्ले, संजय कुमार शेटे, शरद गडाख, अंबादास चौधरी, राजेंद्र सोनवणे, रमेश गायके, घनश्याम मोरे, विशाल गोसावी, प्रशांत पगार, मनीषा अहिरे, एकनाथ रासकर तसेच शिक्षकेतर मधून लक्ष्मण कोरडे, अतुल हांडगे आधी सेवक उपस्थित होते.
कर्मवीर पारितोषिक प्राप्त झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना विद्यालयाचे प्राचार्य सोमवंशी सर म्हणाले की,”मागील शैक्षणिक वर्षात विद्यालयातील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी या सर्वांच्या प्रामाणिक कर्तव्याचे हे फळ आहे”. अशा प्रकारे चांदोरी विद्यालयास आजवर न मिळालेला पुरस्कार घेताना विशेष आनंद होत आहे.कर्मवीर पारितोषिक मिळाल्यानंतर सर्व सेवकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले.