Home नाशिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी ‘रयत’च्या वनसगांव विद्यालयात आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा...

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी ‘रयत’च्या वनसगांव विद्यालयात आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा …..

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20230510-WA0031.jpg

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी ‘रयत’च्या वनसगांव विद्यालयात आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा …..

प्राचार्य सी डी रोटे यांचे पालकांना आवाहन—

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

वनसगांव- येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारे विद्यालय असून इ.५ वी ते १२ वी(आर्टस् व सायन्स) इयत्तेत आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे, पर्यवेक्षक के.बी. दरेकर यांनी केले आहे .
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता इ.५ वी ते १२ या वर्गांसाठी विद्यालयात ‘गुरुकुल प्रकल्प’ हा संस्थेचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात असन अनुभवी शिक्षक वृंद, निसर्गरम्य सुसज्ज इमारत, मराठी व सेमी माध्यमांसाठी डिजिटल शिक्षण, शालेय पोषण आहार, विविध शिष्यवृत्ती योजना, कॉम्प्युटर लॅब, रयत टिंकरिंग लॅब ,सायन्स लॅब ,विविध शिष्यवृत्ती परीक्षा, संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा व मोफत मार्गदर्शन,शासकिय रेखाकला परीक्षा याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम,क्षेत्रभेट, क्रीडा महोत्सव, ग्रंथालय, बाह्य तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन असे सहशालेय उपक्रम वर्षभर राबविले जातात. विद्यालयाच्या ‘माजी विद्यार्थ्यांच्या’ माध्यमातून अनेक भौतिक सुविधा उपलब्ध होत असून शालेय पातळीवर ,संस्था पातळीवर तसेच जिल्हा राज्य पातळीवर निबंध ,वक्तृत्व,गायन ,सामान्यज्ञान, क्रीडा,यांसारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करतात. मोफत पाठ्यपुस्तके, विविध शासकीय योजना अशा सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या वनसगांव विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक व सेवक वृंदांनी केले आहे.

Previous articleपोशेरा पारध्याची मेट येथे शॉर्ट शर्कीटने दुकान जळून खाक
Next articleचांदोरी न्युज इंग्लिश स्कूल ला कर्मवीर पारितोषिक व आदर्श विद्यालय पुरस्कार प्रदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here