Home कोल्हापूर भेळ व्यावसायिक, फोटोग्राफर ते उपसरपंच…. थक्क करणारा प्रवास

भेळ व्यावसायिक, फोटोग्राफर ते उपसरपंच…. थक्क करणारा प्रवास

66
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220528-WA0025.jpg

भेळ व्यावसायिक, फोटोग्राफर ते उपसरपंच…. थक्क करणारा प्रवास

कोल्हापूर, (राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : तळसंदे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील उपसरपंच निवडणुकीत श्री महेश शिवाजी कुंभार यांची उपसरपंच पदी बहुमताने निवड झाली…
त्यामागच्या त्यांच्या जिद्दीला, धडपडीला सलाम करावा असं त्यांचे यश नक्कीच आहे.. शालेय जीवनात एक हुशार विद्यार्थी म्हणून शिक्षण पूर्ण केले..घरी अठरा विश्व दारिद्र्य अशी परिस्थिती होती..महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसं आर्थिक पाठबळ नव्हते त्यामुळे बाहेरून शिक्षण पूर्ण करत राज्यशास्त्र पदवी संपादन केली… घरातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी एमआयडीसी मध्ये 700 रुपये ची नोकरीं स्वीकारली पण तुटपुंज्या पगारात काही मेळ लागत नसल्याने त्यांनी व्यवसायात उतरण्याचे ठरवले….2006 साली एक छोटी भेळची गाडी भाड्याने घेऊन भेळ, पाणीपुरी व्यवसाय सुरु केला सुरुवातीला कमी वाटणारा व्यवसायाचे आज 3 फ्रेंचायजी मध्ये रूपांतर करून दाखवले… उत्कृष्ट, दर्जेदार भेळची सेवा देताना फेमस बटू भेळ या नावाने एक नवीन ओळख निर्माण केली… हा व्यवसाय सुरु असताना त्यानी नेट कॅफे आणि फोटो स्टुडिओ या जोड व्यवसायाची सुरुवात करून त्यात सुद्धा स्वतःची दर्जेदार फोटोग्राफर अशी ओळख निर्माण केली..आज ते हातकणंगले तालुका फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर या फोटोग्राफर बंधूसाठी काम करणाऱ्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत..आज त्यांचे दोन्ही व्यवसाय अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु आहेत..
व्यवसाय करत असताना सामाजिक कार्याची आवड लागली आणि त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन बांधून राजकीय प्रवास सुरु केला… आणि त्यांनी 2017 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकतर्फी विजय प्राप्त केला … त्यानंतर काल झालेल्या उपसरपंच पोटनिवडणुकीत बहुमताने विजय प्राप्त करून तरुण वर्गाकडे एक आदर्श उभा केला… आज ग्रामपंचायत च्या इतिहासा मध्ये सर्वात तरुण उपसरपंच म्हणून त्यांचे नाव कोरले गेले….

Previous articleमालेगावची अजब गजब दुनिया, लोकांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला स्वतःच्या भविष्याची चिंता…!
Next articleआमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पेवर ब्लॉक, सीसी रोड व नाली बांधकामाचे उद्घाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here