Home युवा मराठा विशेष मालेगावची अजब गजब दुनिया, लोकांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला स्वतःच्या भविष्याची चिंता…!

मालेगावची अजब गजब दुनिया, लोकांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला स्वतःच्या भविष्याची चिंता…!

63
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20220528_174750.jpg

मालेगावची अजब गजब दुनिया,
लोकांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला स्वतःच्या भविष्याची चिंता…!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव– खान्देशकन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या परखड अहिराणी बोलीभाषेतून रुढी परंपरा चालीरितीवर सडकून टिका आपल्या काव्यातून केली होती.बहिणाबाई म्हणायच्या,”अरे अरे ज्योतिषा नको हात माह्या पाहू,माहे भविष्य माले कये..माह्या दारी नको येऊ”हे बहिणाबाईचे मर्मभेदक सत्य आजही खरच किती सत्य आहे.आपले भविष्य तळहाताच्या रेघांमध्ये नसून,ते आपल्या कष्टावर व परिश्रमावर अवलंबून आहे,असे बहिणाबाई ठणकावून सांगतात.
मात्र तरीही या विज्ञानयुगात स्वतः ला सुशिक्षित व बुध्दीमान म्हणवून घेणारे जेव्हा आपल्या जीवनाचे भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाचा सहारा घेतात तेव्हा त्यांच्या बुध्दीची किव येते.मालेगांवच्या कँम्परोडवरील अप्पर सत्र न्यायालयाच्या बाहेरच एक कुरमुडे ज्योतिषी अवघ्या काही रुपयात लोकांच्या आयुष्याचे निकल व प्रश्न सहज चुटकीसरशी सोडवतो.जे काम न्यायालयाला सहज शक्य होत नाही वर्षानूवर्ष प्रलंबित पडलेल्या केसेसचा अद्याप न्यायनिवाडा झालेला नाही तेथे मात्र हा कुरमुडे ज्योतिषी भविष्य सांगून तुमचा निकाल व निर्णय लगेचच लावून मोकळा होतो,म्हणजे मालेगावची अजब गजब दुनियादारी ती हिच! स्वतःच्या जीवनाचे भविष्य माहित नसलेला ज्योतिषी मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही तरी कृल्प्त्या करुन पोट भरतो एवढे मात्र खरे!

Previous articleउड्डाणपुलाचे लोकार्पण अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Next articleभेळ व्यावसायिक, फोटोग्राफर ते उपसरपंच…. थक्क करणारा प्रवास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here