Home अमरावती अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठ ला पुन्हा प्रभारी कुलगुरू मिळणार: ४ जानेवारीला मुलाखत...

अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठ ला पुन्हा प्रभारी कुलगुरू मिळणार: ४ जानेवारीला मुलाखत नव्या कुलगुरू चा शोध.

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20231224_064848.jpg

अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठ ला पुन्हा प्रभारी कुलगुरू मिळणार: ४ जानेवारीला मुलाखत नव्या कुलगुरू चा शोध.
————-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती येथील अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे नवे कुलगुरू नव्या वर्षातच मिळतील, यावर” दैनिक युवा मराठा”ने फार पूर्वी शिक्कामूर्तक केले होते. ही बाब तंतोतंत खरी ठरली असून आगामी ३१ डिसेंबर पूर्वी नव्या कुलगुरूची निवड प्रक्रिया अंतिम होऊ शकत नसल्याने विद्यापीठ ला पुन्हा एकदा काही काळासाठी प्रभारी कुलगुरूस मिळणार आहे. अशी घोषणा राजभवन कडून केली जाईल.डा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदावर सोपविण्यात आला आहे. त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस हा ३१ डिसेंबर डिसेंबरला रविवारी असल्यामुळे कदाचित शनिवार, ३० डिसेंबरच्या सायंकाळपर्यंत प्रभारी नवीन कुलगुरूच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी माहिती आहे. दरम्यान नव्या कुलगुरू साठीच्या निवड प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आगामी ४ जानेवारी रोजी पूर्णत्वास जात असून त्यानंतर त्याचा राज्यपालद्वारे मुलाखतीचे वेळ पत्र टाकले जाईल. त्यातून निवडलेल्या उमेदवाराचे नाव त्यानंतर घोषित केले जाईल, अशी ही प्रक्रिया आहे. प्रगल्भ प्रतिभेचे धनी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या या वर्षाच्या प्रारंभ झालेल्या निधनापासून हे पद रिक्त आहे. दरम्यानच्या काळात राजभवनाने औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी म्हणून अमरावती विद्यापीठ चे सूत्र सोपविली. दरम्यानच्या काळात औरंगाबाद आणि अमरावती या दोन विद्यापीठच्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली. त्यात औरंगाबाद विद्यापीठ प्रशासन बरेच पुढे निघून गेले असून त्यासाठी निवड झालेल्या अंतिम पाच नावावर १९ डिसेंबर पूर्वी शिक्का मोर्तब केल्या गेल्याआहे. त्यामुळे येथील कुलगुरूचे नाव कदाचित ३१ डिसेंबर पूर्वीच घोषित होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे अमरावती विद्यापीठ साठी दाखल झालेल्या सुमारे ११५ अर्जा पैकी४० उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले असून त्यांच्या मुलाखती येत्या ४ जानेवारी रोजी मुंबई किंवा पुणे यापैकी एका ठिकाणी होऊ घातले आहेत. या मुलाखती यांची कुलगुरू निवड समिती अंतिम पाच नावे पाठवणार असून त्यानंतर राज्यपाल स्वतः या पाच जणांच्या मुलाखती घेतील व त्यापैकी एक नाव अंतिम: निश्चित करतील, अशी ठरलेली प्रक्रिया आहे. ही संपूर्ण प्रक्रिया फार घाईने पूर्ण केली तरी ती जानेवारी महिन्याच्या पहिला पंधरवडा उलटल्यानंतरच पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे तोपर्यंत प्रभारी पूर्व कुलगुरूंची निवड करणे, हा एकमेव मार्ग राजभवनाकडे शिल्लक आहे कुलगुरूच्या उपस्थिती प्र-कुलगुरू ही दोन्ही पदे’को-टर्मिनस’असल्यामुळे कुलगुरूंच्या निवृत्ती सोबतच प्र-कुलगुरू नाही त्या पदावर दूर व्हावे लागते.

Previous articleडॉ. सुनील जाधव यांच्या रामपुर रोड अतिक्रमणा च्या मतावर देगलुर नगर पालिकेचा शिक्का.
Next articleअमरावतीत खासदारांचे निलंबन विरोधात इंडिया आघाडीचे निदर्शने.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here