Home नांदेड डॉ. सुनील जाधव यांच्या रामपुर रोड अतिक्रमणा च्या मतावर देगलुर नगर पालिकेचा...

डॉ. सुनील जाधव यांच्या रामपुर रोड अतिक्रमणा च्या मतावर देगलुर नगर पालिकेचा शिक्का.

67
0

आशाताई बच्छाव

IMG_20231224_064413.jpg

डॉ. सुनील जाधव यांच्या रामपुर रोड अतिक्रमणा च्या मतावर देगलुर नगर पालिकेचा शिक्का.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलुर , सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉ. सुनील जाधव यांनी 07 डिसेंबर, 2023 रोजी जिल्हाधिकारी महोदय अभिजितजी राऊत यांची भेट घेतली. रामपुर रोड वरील अतिक्रमण हटवुन नाली करावी या साठी दिलेल्या निवेदना नुसार मा. जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी, नगर पालिका देगलुर यांना अतिक्रमण विषयी स्वयं स्पष्ट अभिप्राया सह अहवाल सादर करण्याचा ( न पा प्र नांदेड़ मार्फत ) दि. 17/08/2023 रोजी आदेश दिला होता . या प्रकऱणा विषयी डॉ. सुनील जाधव यांनी वैयक्तिक व मित्र परिवारा सह मुख्याधिकाऱ्याना वारं वार भेटुन अहवाल देण्याची विनंती केली, स्मरण करुन दिले पण अहवाल दिला नाही , विलंब झाला . अजुन विलंब होऊ नये अहवाल देण्याची कार्यवाही व्हावी, आम्हाला व जनतेला अतिक्रमना मुळे अति त्रास होत आहे म्हणुन जुने बस स्टँड व पोलिस कॉर्टर’ ( ज्याचा सर्व्हे नंबर 212, 213, 214 व गट नंबर 601 ,603, 604 आहे ) च्या पूर्वेस अगोदर चा रामपुर होट्टल पाणंद रस्ता आजचा जि प बांधकाम उप विभाग देगलुर चा ग्रामिण मार्ग क्र. 29 हा ( V R ) चाळीस फुटाचा रस्ता आहे तो निश्चित करून त्या वरील अतिक्रमण हटवून नाली व्हावी व नागरिकांना दिलासा मिळावा कार्यवाही करावी या साठी डॉ. सुनील जाधव यांनी जिल्हाधिकारी महोदय यांना दि. 07/12 /2023 रोजी भेटुन वारं वार संबंधित सक्षम प्रशासन यंत्रणेस पाठ पुरावा करुन ही या प्रकऱणा वर कार्यवाही होत नसल्याने सर्व सामान्य जनतेस नाहक अति त्रास सहन करावा लागत आहे हे निदर्शनास आणुन देऊन ना ईलाजास्तव स्मरण अर्ज दिला….. त्या वर जिल्हाधिकारी महोदयांनी “तात्काळ Z- संदर्भ” नुसार त्वरित कार्यवाही केली. त्या मुळे दि. 08/12 /2023 रोजी विषयांकित प्रकरणी नियमानुसार तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश ( न पा प्र ) नांदेड़ जिल्हा सह आयुक्त गंगाधरजी इरलोड यांनी मुख्याधिकारी देगलुर यांना दिले त्या मुळे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी संजय जी नागमवाड यांनी शहर अभियंता अशोक जी पाटील व बांधकाम विभागाचे इम्तियाज भाई , गिरीश आउलवार , राहूल श्रीरामवार व टिम सह दीर्घ काळा पासुन वारं वार पाठ पुरावा करुन प्रलंबित असलेल्या अतीक्रमणाच्या या प्रकऱणा वर तात्काळ कार्यवाही करुन जुने बस स्टँड (सर्वे 212, 213) च्या पुर्वेस रस्त्यावर वर टिन शेड व आर सी सी चे दोन ते तीन मजली बांध काम केलेले आहे . 22 ते 27 वर्षा च्या काळात ही घरे बांधकाम करुन अतिक्रमण झाल्याचे दिसुन येते . कच्चे व पक्के बांध काम केल्यामुळे रस्ता हा छोटा झाला आहे या वर शिक्कामोर्तब केला म्हणुन नागरी सुविधा पुरविणे योजना अंतर्गत रस्त्याच्या पुर्वेस 100 मिटर नाली करणे शिल्लक आहे व पश्चिमे कडील नाली पुर्ण झाली आहे अहवाल सादर केला आहे . जिल्हाधिकारी महोदय हे अतिक्रमण हटवून छोटा झालेला रस्ता चाळीस फुट करुन नाली करण्याची कार्यवाही करतील व सर्व सामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे .
डॉ. सुनील जाधव सह मित्र परिवारातील सतीश जाधव , वसंत बाबुराव वलेपवार , राजेश कळसकर , डॉ. श्याम कळसकर , डॉ. अभि गऊळकर , डॉ. अश्विनी गऊळकर , हणमंत श्रीरामावार , रमेश अम्रुतवार , विशाल व ओंकार अम्रुतवार , श्रीनिवास नाईक , रमेश घुळेकर सह शिवबा नगर , नाथ नगर , डॉ बाबा साहेब आंबेड्कर नगर , दत्त नगर , शिवनेरी नगर , गोविन्द नगर सह राजशेखर मंगल कार्यालया पर्यन्त च्या अनेक वाढत जात असलेल्या वस्त्या तील हजारो घरातील हजारो नागरीकांचा , शाळा , महाविदयालयातील विद्यार्थ्यांचा , रुग्णालय व रुग्णांचा , महिला , जेष्ठ नागरीक यांचा तसेच रामपुर , लिन्गन केरूर गावातील ग्रामस्थ , शेतकरी यांचा , या भागात कामा निमित्त येणाऱ्या शहरातील व ईतर गावातून येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील जनतेचा या अतिक्रमना मुळे होणाऱ्या अति त्रासाच्या विरोधातील लढा आहे . करिता शासन , संबंधित प्रशासन , राजकीय , सामाजिक , संघटना पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे कारण जुन्या बस स्टँड लगत पूर्वेस रामपुर रोड वरील 10/12 जणांच्या अतिक्रमणा मुळे 50/60 लोकांचा फायदा होत आहे व अतिक्रमणाचा त्रास हजारो महिला भगिनी , पुरुष , लहान मुले , ज्येष्ठ नागरीक , तरूण , तरुणी यांना होत आहे अशी प्रतिक्रिया जनतेतुन येत आहे याची जान संबंधीत शासक व प्रशासक यांना असावी , *म्हणुन जिल्हाधिकारी महोदय यांनी जुने बस स्टँड हद्दी पूर्वेस रोड वरील अतिक्रमण हटवून छोटा झालेला रोड चाळीस फुट करुन नाली करण्याची कार्यवाही करावी व मोठ्या संख्येने त्रस्त आम्हा जनतेस दिलासा द्यावा.या कामी कुणी पक्षपात , राजकारण करू नये , कुणी काही विलंब , अडथळा आणु नये , स्वतः च्या फायद्या साठी , व्यापक जन हिताच्या या कामात कुणी स्वार्थ साधु नये . कुणी अतिक्रमणास खत पाणी घालु नये तसे झाले तर या भागातील घरा घरातील सर्व नागरीकानी ऐकोप्याणे जन आन्दोलन , उपोषण आदी सर्व प्रकारच्या लोकशाही मार्गांनी अतिक्रमण हटाव लढा देऊन न्याय मिळवण्या साठी सहभागी होऊन आपला गरजवन्त, जनसामान्यांच्या लढा देण्यास एकत्र यावे , पाठ बळ द्यावे व हा सन्देश फेस बुक , व्हाट्स अप व ईतर प्रसार माध्यमातुन आपल्या भागातील सर्वा पर्यंत पोहन्चवावा असे विनंती युक्त आवाहन मी डॉ सुनील जाधव आपणा सर्वा सह देगलुर शहर व परिसरातील सर्व समाज बंधु भगिनीना करतो जय हिंद अभी नही तो कभी नही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here