Home नांदेड देगलूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात जादूटोणा विषयी समाज प्रबोधन..

देगलूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात जादूटोणा विषयी समाज प्रबोधन..

133

आशाताई बच्छाव

IMG_20240204_062636.jpg

देगलूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात
जादूटोणा विषयी समाज प्रबोधन..

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर: ग्रामीण भागात आजही जादूटोण्याविषयी समाजामध्ये गैरसमज दिसून येतो यामुळे अंधश्रद्धा पसरविण्याचे काम अनेक जण करीत असतात, याकरिता समाज प्रबोधनासाठी जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत मच्छिंद्र गवाले यांनी मांडले.
देगलूर महाविद्यालयाच्या वतीने मौजे रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे ३१जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
याअंतर्गत विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,चौथ्या दिवशीच्या कार्यक्रमांतर्गत अंधश्रद्धा विषयावर मच्छिंद्र गवाले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावरून बोलत होते ,
अंधश्रद्धा निर्मूलनावर विविध प्रयोगाद्वारे व उदाहरणाचे दाखले देत सखोल मार्गदर्शन केले, यावेळी जादूटोणाविषयी समाजजागृती ची आवश्यकता आहे याकरिता प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले .
देगलूर महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.व्ही एन काळे,प्रा व्ही.ए. खंदकुरे प्रा.जी एम क्यादारे , रत्नाकर चिद्रावार ,तसेच रामपूर गावचे सरपंच राम पांडवे सह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleलाडली बेटीया’ चित्रपटाच्या शो ला परळीत प्रेक्षकांची तुफान गर्दी
Next articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलगावं येथे कुलूप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.