• Home
  • पेठ वडगांवमधील माजी.नगराध्यक्षा यांचा अनमोल* *उपक्रम*

पेठ वडगांवमधील माजी.नगराध्यक्षा यांचा अनमोल* *उपक्रम*

*पेठ वडगांवमधील माजी.नगराध्यक्षा यांचा अनमोल* *उपक्रम*
कोल्हापूर,(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर
यादव आघाडीच्या वतीने कोरोनाचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी होमिओपॅथी औषध प्रत्येक घरात देण्याचे मा.नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी वयक्तीक नियोजन केले.

हातकणंगले तालुक्यात वडगांवात शहरामध्ये प्रत्येक घरातील नागरिकांना ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या रोगप्रतिकारक होमिओपॅथी औषधांच्या गोळ्या घराघरांत वाटप करण्यात येत आहे. हा उपक्रम विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. यांचा शुभारंभ माजी नगरसेवक राजकुमार पोळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यादव आघाडीच्या नेत्या व माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी कोरोनाच्या बाबतीत संवेदनशील राहत.स्वतंत्र पणे नागरिकांना मदत देण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरातील ६ हजार पाचशे घरातील २५ हजार नागरिकांना ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या रोगप्रतिकारक होमिओपॅथी औषधांच्या गोळ्या वाटपाच्या सूचना केल्या आहेत.

विवेकानंद पथ येथे जेष्ठ नागरिक आण्णासाहेब शिंदे व शहरातील २५ कुटुंबाना देवून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर शहरातील सर्व घरात ही औषधे देण्यात येणार आहे.
यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ यांची सत्ता नसताना देखील केवळ वडगांवच्या जनतेच्या आरोग्याच्या काळजी पोटी नेहमीच समाजकार्य करण्यासाठी अग्रेसर असतात.
सत्ता असो वा नसो याची फिकीर न बाळगता राजकारण न करता फक्त समाजकार्यात नेहमीच एक पाऊल पुढे असते.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष आनंदा म्हेत्रस, जेष्ठ नागरिक आण्णासो शिंदे,
अनिल भोपळे,
महेश भोपळे, रमेश पाटील, ओंकार ठाणेकर, सुरेंद्र जाधव,
शोभा देसावळे,शांतादेवी गडदे ,राजश्री जाधव,सुजाता बसागरे, नेत्रा शिंदे, अर्चना भोपळे ,वैजयंता पाटील,शरिफा शिकलगार आदी उपस्थित होत्या.

anews Banner

Leave A Comment