Home जळगाव ४ लाखांची लाच घेताना बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंताला अटक!

४ लाखांची लाच घेताना बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंताला अटक!

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230921-WA0017.jpg

४ लाखांची लाच घेताना बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंताला अटक!

खान्देश विभागीय संपादक, योगेश पाटील.

चाळीसगाव – क्लस्टर विकसीत करण्याच्या कामाचे चार कोटी ८२ लाखांचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती चार लाखांची लाच घेताना चाळीसगाव बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (अशोक नगर, धुळे) यांना नाशिक एसीबीने नाशिकमधील गडकरी चौकात शनिवारी सायंकाळी पकडले होते. विसपुते यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना २० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, तर कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, नाशिकच्या तक्रारदाराने डॉ.शामा प्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उपविभाग, ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा, ता. चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसीत करण्याचे काम घेतले होते. या कामाची चार कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाच्या अतिरीक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात
आरोपी विसपुते यांनी पाच लाखांची लाच मागितली मात्र चार लाखात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारदार हे नाशिकमध्ये आल्यानंतर सार्वजनिक रस्ता गडकरी चौकात शनिवारी सायंकाळी लाच स्वीकारताच विसपुते यांना अटक करण्यात आली.नाशिकमध्ये विसपुते यांना अटक केल्यानंतर एसीबीने धुळ्यातील अशोक नगरातील निवासस्थानाची झडती घेतली असता तब्बल २७ तोळे सोने आढळून आल्याची माहिती एसीबीने दिली होती तसेच काही बँकांचे पासबुकही जप्त करण्यात आले आहे.
सदर विसपुते यांना न्यायालयात हजर केल्यानंतर २० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, तर बुधवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे अधिकारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here